रायगड -जिल्ह्यातील विविध सामाजिक संस्थांनी एकत्र येऊन मतदार जागर जनमंच स्थापन केला आहे. त्याच्या वतीने मंगळवारी कोलाड येथे लोकसभा निवडणुकीतील उमेदवारांना आपली भूमिका मांडण्यासाठी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुनील तटकरे व वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार सुमन कोळी यांनी उपस्थित राहून आपली व आपल्या पक्षाची भूमिका मांडली. या कार्यक्रमाला युतीचे उमेदवार अनंत गीते यांनी गैरहजेरी लावली होती.
मतदार जागर मंचाच्यावतीने जो श्रमिक जनतेचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्यानुसार अंमलबजावणी करण्याचे आश्वासन या उमेदवारांनी यावेळी दिले. नागरिकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तरेही उमेदवारांनी दिली. जागर मंचाच्या उल्का महाजन यावेळी उपस्थित होत्या.