महाराष्ट्र

maharashtra

गावची ओळख निर्माण करणाऱ्या तरुणावर काळाचा घाला, नदीत बुडून मृत्यू

रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यातील कुडपण गावाची ओळख निर्माण करणाऱ्या एक तरुणाचा काल शनिवारी मुंबईतील मित्रांसोबत नदीवर पोहण्यास गेला असता नदीत बुडून मृत्यू झाला. राजेंद्र शेलार (26) असे मृत तरुणाचे नाव आहे.

By

Published : Jul 28, 2019, 2:50 PM IST

Published : Jul 28, 2019, 2:50 PM IST

कुडपनची ओळख निर्माण करणाऱ्या तरूणावर काळाचा घाला, नदीत बुडून मृत्यू

रायगड - जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यातील कुडपण गावाची ओळख निर्माण करणाऱ्या एक तरुणाचा काल शनिवारी आपल्या मुंबईतील मित्रांसोबत नदीवर पोहण्यास गेला असता नदीत बुडून मृत्यू झाला. राजेंद्र शेलार (26) असे मृत तरुणाचे नाव आहे. त्याचा मृतदेह कुडपन बुद्रुक या गावाकडे जाणाऱ्या जगबुडी नदीच्या छोट्या पुलाच्या खाली सापडून आला. पोलीस, सिस्का ग्रुप महाड व ग्रामस्थांच्या वतीने त्याचा या तरुणाचा मृतदेह रात्री नऊच्या सुमारास बाहेर काढण्यात आला.

कुडपनची ओळख निर्माण करणाऱ्या तरूणावर काळाचा घाला, नदीत बुडून मृत्यू

राजेंद्र शेलार हा कुडपन येथील निसर्गरम्य परिसरातील रहिवासी असून मुंबई येथे नोकरीनिमित्त राहत होता. मिनी काश्मीर म्हणून कुडपनची ओळख असलेले आपले गाव पर्यटनस्थळ म्हणून प्रसिद्ध व्हावे, यासाठी राजेंद्र मुंबईतील आपल्या मित्रांना येथे पर्यटनास घेऊन येत असे. शनिवारी 27 जुलै रोजी राजेंद्र हा आपल्या मुंबईतील मित्रांसह कुडपन येथे पावसाळी पर्यटनास आला होता. यावेळी गावातील नदीमध्ये तो मित्रांसह पोहण्यास गेला असता पावसाचा जोर असल्याने नदीचे पाणी वाढले. त्यामुळे राजेंद्र पोहताना पाण्याच्या उथळ पाण्यात बुडून वाहू लागला. त्याच्यासोबत असलेल्या मित्रांनी त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना यश आले नाही.

राजेंद्रच्या मृतदेहाचा शोध सायंकाळपासून सुरू होता. त्यानंतर रात्री नऊच्या सुमारास राजेंद्र याचा मृतदेह पोलंडपूरपासून 25 किलोमीटरवर कुडपन बुद्रुक या गावाकडे जाणाऱ्या जगबुडी नदीच्या छोट्या पुलाच्या खाली दगडाच्या सांध्यामध्ये पाण्यात अडकून पडल्याची खबर पोलिसांना मिळाली. त्यानंतर रेस्क्यू ऑपरेशन सुरू झाले. पोलीस, सिस्का ग्रुप, महाड व कर्तव्य प्रतिष्ठान, पोलादपूर यांच्या सहकार्याने राजेंद्र याचा मृतदेह काढण्यास सुरुवात केली.

नदीचा प्रवाह जास्त असल्याने ट्रेकिंगच्या सहाय्याने मोठा धोका पत्करून राजेंद्र याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. हे रेस्क्यू ऑपरेशन तीन तास सुरू होते. ज्या राजेंद्रला आपले कुडपन गाव प्रसिद्ध करायचे होते, त्याच्यावरच काळाने घाला घातल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details