रायगड- मुंबई-पुणे महामार्गावर पेण रेल्वे स्थानकासमोर इको कार व डंपरचा भीषण अपघात झाला. या अपघातात १ जण ठार, तर ६ जण जखमी झाले. जखमींना पेण उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलेले आहे. विनोद चाळके (४२) असे या अपघातात ठार झालेल्या प्रवाशाचे नाव आहे.
मुंबई-पुणे महामार्गावर कारची डंपरला धडक : अपघातात १ जण ठार ६ जखमी - Accident
मुंबई-पुणे महामार्गावर पेण रेल्वे स्थानकासमोर इको कारने डंपरला मागून धडक दिली. या भीषण अपघातात १ जण ठार झाला, तर ६ जण जखमी झाले आहेत.
इको कार (एमएच ०८, एएन-४८३१) रत्नागिरीवरून मुंबईकडे निघाली होती. पहाटे सात वाजताच्या सुमारास पेण रेल्वे स्थानकाजवळ इको कार भरधाव वेगाने येत होती. यावळी पुढे जाणाऱ्या डंपरला (एमएच ०४, इबी-७८९१) मागून जोरदार धडक दिली. धडक एव्हढी जोरदार होती, की इको कारच्या धडकेने डंपर रस्त्याच्या खाली जाऊन पडला. या अपघातात इको कारमधील सात प्रवाशांपैकी एक जण जागीच ठार झाला. तर सहा जण जखमी झाले आहेत.
नंदकुमार भिकाजी बांडागले (४४), रमेश गोपाळ (४७), प्रदीप मांडवकर (५१) हे जखमी झाले आहेत. जयवंत श्रीराम शिर्के (४५), सतीश रामचंद्र भोपळे (४७), प्रकाश हिराजी चाचे (५२) हे गंभीर जखमी झाले आहेत. सर्व प्रवासी देवरुख रत्नागिरी येथील राहणारे आहेत. अपघातानंतर अपघातग्रस्तांना पेण वाहतूक पोलिसांसह कल्पेश ठाकूर व मयूर पाटील यांनी रुगणालायत दाखल करण्यासाठी तात्काळ मदत केली.