रायगड - पोलादपूर येथील कोरोनाबाधित मृत महिलेच्या पतीचा अहवाल हा कोरोना पॉझिटीव्ह आला आहे. त्याच्यावर पनवेल रुगणालायत उपचार सुरू आहेत, तर मुलगा आणि सुनेचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. आज जिल्ह्याच्या ग्रामीण भागात आणखी एक कोरोनाबाधित रुग्णाची वाढ झाल्याने संख्या 17 वर पोहोचली आहे.
पोलादपूरमध्ये कोरोनाचा दुसरा पॉझिटिव्ह रुग्ण, रायगडमध्ये कोरोनाग्रस्तांचा आकडा १७ वर - कोरोना अपडेट
पोलादपूर येथील ६५ वर्षीय वृद्ध महिलेचा अहवाल चार दिवसांपूर्वी पॉझिटिव्ह आला होता. तिच्यावर पनवेल येथे उपचार सुरू होते. मात्र, 18 एप्रिलला उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. वृद्ध महिलेच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते.
पोलादपूर येथील ६५ वर्षीय वृद्ध महिलेचा अहवाल चार दिवसांपूर्वी पॉझिटिव्ह आला होता. तिच्यावर पनवेल येथे उपचार सुरू होते. मात्र, 18 एप्रिलला उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. वृद्ध महिलेच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. यामध्ये पती, मुलगा आणि सून याचे नमुने पाठविले होते. आज आलेल्या अहवालामध्ये मृत वृद्धेच्या पतीचा अहवाल हा पॉझिटिव्ह आला आहे, तर मुलगा आणि सुनेचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. पोलादपूर तालुक्यात आता कोरोनाबाधितांची संख्या दोनवर पोहोचली आहे. त्यामुळे पोलादपूर शहर परिसर हा पूर्णपणे बंद केला आहे.