महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कलमार क्रेन चालकाच्या हलगर्जीपणामुळे कामागाराचा मृत्यू, कुटुंबाला ३० लाखांची मदत जाहीर

उरण द्रोणागिरी इथे असलेल्या सीबर्ड कंपनीच्या आवारात कलमार क्रेनच्या मदतीने कंटेनर ट्रेलरवर ठेवण्याचे काम सुरू होते. किरण कोरडे हा ग्लोबल लॉजेस्टिक कंपनीत सीएचए म्हणून काम करत होता.

कलमार क्रेन चालकाच्या हलगर्जीपणामुळे कामागाराचा मृत्यू, कुटुंबाला ३० लाखांची मदत जाहीर

By

Published : May 4, 2019, 7:07 PM IST


पनवेल -उरण द्रोणागिरी इथल्या सीबर्ड कंटेनर गोदाममध्ये कलमार क्रेन चालकाच्या हलगर्जीपणामुळे शुक्रवारी (३ मे) एका कामगाराचा मृत्यू झाला. या घटनेनंतर कामगारांनी कंपनीचे कामकाज बंद केले होते. किरण कोरडे असे या घटनेत मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्याच्या कुटुंबाला सीबर्ड कंपनीने ३० लाखाची नुकसानभरपाई जाहीर केली.

उरण द्रोणागिरी इथे असलेल्या सीबर्ड कंपनीच्या आवारात कलमार क्रेनच्या मदतीने कंटेनर ट्रेलरवर ठेवण्याचे काम सुरू होते. किरण कोरडे हा ग्लोबल लॉजेस्टिक कंपनीत सीएचए म्हणून काम करत होता. त्याच वेळी ही क्रेन त्याच्या बाजूने जात होती. मात्र, कलमार चालकाच्या हलगर्जीपणामुळे किरण कोरडे याला कलमारचा जोरात धक्का लागला. यात तो कलमारच्या पुढच्या चाकाखाली आला. त्यानंतर देखील हा अपघात घडल्याचे कलमार चालकाच्या लक्षात आले नाही. त्याने कलमार न थांबवता तसाच पुढे चालू ठेवला. यात किरण कोरडे हा कलमारच्या अवजड चाकात गुंडाळुन जवळपास १५ ते २० फूट अंतरावर फरफटत गेला. त्यामुळे किरण कोरडे याच्या शरीराचे अक्षरशः चिंधड्या होऊन तो जागीच ठार झाला.

किरण कोरडे यांच्या पत्नीला देण्यात आलेले पत्र

या घटनेनंतर येथील कामगारांचा रोष वाढला. यावेळी सीबर्ड कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक श्रीनिवास हे लगेचच कंपनीत घटनास्थळी आले. यावेळी रौद्र रूप धारण केलेल्या सर्व कामगारांनी मृत किरण कोरडे यांच्या पत्नीला ५० लाख रुपयांची नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी धरली. किरण कोरडे यांच्या पत्नी या पोलीस दलात काम करत असल्याची माहिती मिळाली आहे. अखेर कामगारांच्या मागण्या मान्य करत सीबर्ड कंपनीने मृत किरण कोरडे यांच्या पत्नीला ३० लाखांची नुकसान भरपाई देण्याचे जाहीर केले.

ABOUT THE AUTHOR

...view details