रायगड: खालापूर तालुक्यातील चौकगाव येथील नढाळ धरणात पोहण्यास गेलेल्या एकाचा बुडून मृत्यु झाल्याची घटना घडली आहे. जोएल डिसुझा (34, संताक्रूज, मुंबई) असे बुडालेल्या युवकाचे नाव आहे.
खालापूर तालुक्यातील नढाळ धरणात बुडून एकाचा मृत्यु - खालापूर तालुक्यातील नढाळ धरणात बुडून एकाचा मृत्यु
खालापूर तालुक्यातील चौकगाव येथील नढाळ धरणात पोहण्यास गेलेल्या एकाचा बुडून मृत्यु झाल्याची घटना घडली आहे. जोएल डिसुझा (34, संताक्रूज, मुंबई) असे बुडालेल्या युवकाचे नाव आहे.
मुंबईतील संताक्रूज येथून १० जण दुपारच्या वेळी खालापूर तालुक्यातील नढाळ धरणावर फिरायला गेले होते. त्यावेळी जोएल डिसुझा हे आपल्या मित्रांसोबत धरणात पोहण्यास उतरले होते. पाण्याचा अंदाज न आल्याने डिसुझा हे बुडायला लागले. त्यावेळी सोबत असलेल्या मित्रांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना यश आले नाही.
डिसुझा हे बुडायला लागल्यावर त्याच्या मित्रांनी आरडाओरड सुरू केला. स्थानिक ग्रामस्थ घटनास्थळी पोहाचले. त्यांनी डिसुझा यांचा शोध सुरू केला. त्यानंतर खोपोली येथील रेस्क्यू टीम व पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी डिसुझांचा मृतदेह पाण्याबाहेर काढला. मृतदेह खालापूर येथील प्राथमिक रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.