महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Apr 19, 2020, 4:49 PM IST

ETV Bharat / state

पोलादपूरमधील कोरोनाबाधित वृद्ध महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू

पोलादपूर येथील वृद्ध महिलेचा मुलगा, सून हे ३० मार्च रोजी आपल्या गावी आले होते. त्यानंतर मुलाच्या आईला ताप, सर्दी सुरू झाले होते. महाड येथील खाजगी रुग्णालयात या महिलेवर उपचार सुरू होते. त्यानंतर मुंबई कस्तुरबा रुग्णालयात या महिलेला दाखल करण्यात आले. या महिलेचे नमुने तपासणीसाठी पाठवले असता १८ एप्रिल रोजी त्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. या घटनेमुळे पोलादपूरमध्ये भीतीचे वातावरण झाले होते.

old woman dies during corona treatment at poladpur
पोलादपूरमधील कोरोनाबाधित वृद्ध महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू

रायगड -पोलादपूर येथील कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या ६५ वर्षीय वृद्ध महिलेचा कस्तुरबा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. १८ एप्रिल रोजी या वृद्ध महिलेचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. या महिलेवर कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरू होते.

पोलादपूरमधील कोरोनाबाधित वृद्ध महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू

पोलादपूर येथील वृद्ध महिलेचा मुलगा, सून हे ३० मार्च रोजी आपल्या गावी आले होते. त्यानंतर मुलाच्या आईला ताप, सर्दी सुरू झाले होते. महाड येथील खाजगी रुग्णालयात या महिलेवर उपचार सुरू होते. त्यानंतर मुंबई कस्तुरबा रुग्णालयात या महिलेला दाखल करण्यात आले. या महिलेचे नमुने तपासणीसाठी पाठवले असता १८ एप्रिल रोजी त्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. या घटनेमुळे पोलादपूरमध्ये भीतीचे वातावरण झाले होते.

उपचारादरम्यान या महिलेची प्रकृती खालावली आणि रात्री तिने अखेरचा श्वास घेतला. या वृद्ध महिलेच्या संपर्कात आलेल्या आठ जणांनाही क्वारंटाईन केले असून त्याचे नमुने तपासणीसाठी पाठवले आहेत. या महिलेच्या मृत्यूनंतर रायगड जिल्ह्यातील कोरोनामुळे मरण पावलेल्याची संख्या दोन झाली आहे. तर पोलादपूर शहर परिसर हा पूर्णतः बंद करण्यात आला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details