रायगड - जिल्ह्यातील 8 ग्रामपंचायतीमध्ये 269 सदस्य व 10 सरपंच पदासाठीची सार्वत्रिक पोटनिवडणूक 23 जूनला आहे. 6 जूनला सरपंच व सदस्य पदासाठी अर्ज भरण्याची शेवटची तारीख होती. सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणुकीत 8 सरपंच पदासाठी 32 तर 94 सदस्य पदासाठी 266 जणांनी उमेदवारी अर्ज भरले आहेत. पोटनिवडणुकीसाठी 269 जागांवर सदस्य पदासाठी 129 तर 10 सरपंच पदासाठी केवळ एक उमेदवारी अर्ज दाखल झाला आहे.
23 जूनला जिल्ह्यातील ग्रामपंचायत सदस्य व सरपंच पदासाठी सार्वत्रिक पोटनिवडणूक होत आहे. अलिबाग 2, पेण 1, पनवेल 3, उरण 2 अशा आठ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका होत आहेत. यामध्ये थेट सरपंच पदासाठी 32 उमेदवारी अर्ज आले आहेत, तर सदस्य पदासाठी 266 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.