महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'निसर्ग' वादळग्रस्तांची व्यापाऱ्यांकडून लूट, पत्र्यांच्या किंमतीत दुप्पट वाढ - Nisarga Cyclone update

घराची, दुकानांची व सोसायट्यांचे उडालेले पत्रे पुन्हा नव्याने टाकण्याकरता अनेक नागरिकांनी शहरातील दुकाने गाठली आहेत. मात्र, येथील सिमेंटचे पत्रे, लोखंडी पत्रे, कौले, ढापे व लोखंडी पाईपाचे भाव ऐकून नागरिकांच्या पायाखालची वाळू सरकत आहे.

Raigad Nisarga Cyclone
रायगड निसर्ग चक्रीवादळ

By

Published : Jun 8, 2020, 10:14 PM IST

रायगड - निसर्ग चक्रीवादळाचा फटका बसलेल्या रायगड जिल्ह्यातील गोरगरीब नागरिकांची व्यापाऱ्यांकडून लूटमार होत आहे. निसर्ग चक्रीवादळाचा तडाखा रायगड जिल्ह्यातील लाखो नागरिकांना बसला आहे. या चक्रीवादळामध्ये लाखो नागरिकांच्या घराची, दुकानांची छपरे उडाली आहेत. चक्रीवादळ गेल्यानंतरही मागील 4 दिवसांपासून सातत्याने पाऊस पडत असल्याने नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

घराचे, दुकानांचे व सोसायट्यांचे उडालेले पत्रे पुन्हा नव्याने टाकण्याकरता अनेक नागरिकांनी शहरातील दुकाने गाठली आहेत. मात्र, येथील सिमेंटचे पत्रे, लोखंडी पत्रे, कौले, ढापे व लोखंडी पाईपाचे भाव ऐकून नागरिकांच्या पायाखालची वाळू सरकत आहे.

नेहमी 250 रुपयांना मिळणारा सिमेंटचे 6 फुटी पत्रा सध्या 500 रुपयांना मिळत आहे. तर 350 रुपयांना मिळणारा 8 फुटी पत्रा 700 रुपयांना विकला जात आहे. 55 रुपये फूट मिळणारा लोखंडी पातळ रंगीत पत्रा सध्या 95 रुपये फूट मिळत आहे. तसेच 90 रुपये फूट मिळणारा जाड लोखंडी रंगीत पत्रा सध्या 160 रुपये फूट मिळत आहे.

या पत्र्याखाली लागणारा गँल्व्हनाईझ पाईप 15 रुपये फूटप्रमाणे मिळत होता. परंतु, आता तो 35 रुपये फूटप्रमाणे विकला जात आहे. तर त्यातीलच जाड क्वालिटीचा पाईप वादळापूर्वी 32 रुपये फूटप्रमाणे विकला जात होता. आता मात्र तो 70 रुपये प्रति फूट विकला जात आहे. रोज लाखो रुपयांचा माल विकणारे व्यापारी जाणून-बुजून कोणत्याही प्रकारचे टॅक्स सरकारला भरायला लागू नये, म्हणून ग्राहकांना कोणत्याही प्रकारचे पक्केे बिल देत नाहीत.

बिल्डिंग, बंगलो व ब्लॉक संस्कृतीमुळे कौलारू घरात राहणाऱ्यांची संख्या मर्यादित आहे. सध्या कौल व ढापे नवीन बनविण्ययाचे काम पूर्णपुणे बंद असल्याने कौल व ढापेेंंना सोन्याचा भाव आला आहे. थोडक्यात निसर्ग चक्रीवादळाचा मार बसलेल्या आपदग्रस्तांना संधीसाधू स्वार्थी व्यापारी दामदुपट्टीने माल विक्री करून लूट करत आहेत. अगोदरच कोरोना व लॉकडाऊनमुळे उत्पन्नावर परिणाम झालेल्या गरीब नागरिकांची व्यापाऱ्यांकडून होणारी लूट प्रशासनाने त्वरित थांबवावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details