पेण (रायगड) - पेण तालुक्यातील वडखळ येथे कोरोनाचा रुग्ण सापडला आहे. वडखळ येथील एका नऊ वर्षाच्या बालकाला कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती पेणच्या तहसीलदार अरुणा जाधव यांनी दिली. तालुक्यातील हा पहिलाच कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आहे. सुरुवातीला केवळ पनवेल, उरणमध्ये असलेला कोरोनाचा प्रादुर्भाव हळूहळू रायगड जिल्ह्याच्या अन्य तालुक्यांमध्येही दिसायला लागला आहे.
वडखळ येथील 9 वर्षाच्या मुलाला कोरोनाची लागण - raigad covid 19
पेण तालुक्यातील वडखळमध्ये कोरोनाचा रुग्ण आढळून आला आहे. येथील 9 वर्षांच्या मुलाला कोरोनाची लागण झाली आहे. आजारी असलेल्या या मुलाला दोन-तीन दिवसांपूर्वी मुंबईतील वाडिया हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.
आतापर्यंत जिल्ह्यातील पनवेल, उरण, श्रीवर्धन, महाड, पोलादपूर, अलिबाग, तळा, कर्जत, खालापूर अशा 9 तालुक्यांमध्ये कोरोनाच्या रुग्णांची नोंद झाली होती. आता यामध्ये पेण तालुक्याचाही समावेश झाला आहे. पेण तालुक्यातील वडखळमध्ये कोरोनाचा रुग्ण आढळून आला आहे. येथील 9 वर्षांच्या मुलाला कोरोनाची लागण झाली आहे. आजारी असलेल्या या मुलाला दोन-तीन दिवसांपूर्वी मुंबईतील वाडिया हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तेथे त्याची स्वॅब टेस्ट करण्यात आली होती. आज अहवाल आला. त्यामध्ये या मुलाला कोविड -19 ची लागण झाले असल्याचे स्पष्ट झाले आहे.
मुलाला पुढील उपचारासाठी नायर हॉस्पिटलमध्येे हलविण्यात आले असल्याचेही तहसीलदार अरुणा जाधव यांनी सांगितले. दरम्यान, या मुलाला कोरोनाची लागण कशी झाली? तसेच त्याच्या संपर्कात कोण कोण आले आहेत? याची कॉन्टॅक्ट ट्रेसिंग सुरू असल्याची माहिती आम्ही घेत असल्याचे तहसीलदार म्हणाल्या.