पेण (रायगड) - शिक्षकांची पंढरी म्हणून ओळख असलेल्या पेण तालुक्यात केवळ पदवीपर्यंतचे शिक्षण घेणारे कॉलेज आहेत. यामुळे अनेक विद्यार्थी फक्त पदवीधारकच झालेत. तालुक्यात अनेक शिक्षक तयार झाले आहेत. मात्र फार कमी विद्यार्थी विविध क्षेत्रात अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. म्हणून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीकरिता पेण मध्येच पुढील शिक्षण मिळविण्यासाठी न्यू व्हिजन महाविद्यालयाची स्थापना करण्यात आली आहे.
परिसरातील विद्यार्थी डिग्री, डिप्लोमा सारखे शिक्षण घेणार
याच माध्यमातून पेण व परिसरातील विद्यार्थी यू.पी.एस.सी, एम.पी.एस.सी, पी.एच.डी, डिग्री, डिप्लोमा सारखे शिक्षण घेणार असल्याचे वक्तव्य पेण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मंगेश नेने यांनी केले. ते महाविद्यालयाच्या महाविद्यालयाच्या कार्यालयाच्या उद्घाटनाप्रसंगी बोलत होते. यावेळी न्यू व्हिजन एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष राजू पिचीका, उद्योजक तथा संचालक रशाद मुजावर, सुजित काठे, मिलिंद कांबळे, संचालिका प्रतिक्षा कदम, निता रामधरणे, गौरव रामधरणे, प्रणाली कांबळे आदी संचालक पदाधिकारी उपस्थित होते.