रायगड -शासनाला कोट्यावधी रुपयांचा महसूल मिळवून देणाऱ्या पेण येथील दुय्यम निबंधक कार्यालयाला पहिल्याच पावसाचा जोरदार फटका बसला आहे. या कार्यालयात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. यामुळे या कार्यालयाचे कामकाज काही काळा ठप्प झाले होते. दरम्यान, पेण येथील दुय्यम निबंधक अधिकारी संजय घोडजकर यांनी तातडीने प्लास्टिक टाकून डागडुजी करून घेतली आहे. त्यामुळे या कार्यालयाचे कामकाज पुन्हा सुरू होऊ शकले आहे.
दुय्यम निबंधक कार्यालयाकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष - Deputy Registrar
पेण येथील दुय्यम निबंधक कार्यालयाला पहिल्याच पावसाचा जोरदार फटका बसला आहे. या कार्यालयात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. यामुळे या कार्यालयाचे कामकाज काही काळा ठप्प झाले होते.
अपघात होण्याचीही शक्यता
मागील अनेक वर्षांपासून सदरच्या कार्यालयाला नवीन इमारत बांधण्यात यावी, अशी मागणी वरिष्ठ कार्यालयाकडे केली आहे. त्यासाठी निधीसुद्धा उपलब्ध आहे. तसेच, कार्यालयालासाठी जागा हस्तांतरित करावी, अशी मागणीही केली आहे. त्याचप्रमाणे सार्वजनिक बांधकाम विभागाकडे गळक्या कार्यालयाच्या दुरुस्तीकरिता वारंवार लेखी पत्रे देऊनही त्यांनी याची दखल घेतलेली नाही. याउपर सार्वजनिक बांधकाम विभागाने काळजी घ्यावी, अशी लेखी सूचना केल्याची माहिती घोडजकर यांनी दिली. तसेच, मागील 3 वर्षांपासून आपण स्वखर्चाने या कार्यालयाची डागडुजी करत असल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच, कार्यालयाची इमारत जुनी असल्याने, आता त्या ठिकाणी तातडीने नवीन इमारत बांधणे गरजेचे आहे. अन्यथा, अपघात होण्याचीही शक्यता नागरिकांकडून वर्तवण्यात येत आहे.