महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jul 31, 2019, 7:46 PM IST

Updated : Jul 31, 2019, 8:29 PM IST

ETV Bharat / state

मी पक्ष सोडणार नाही, सदैव शरद पवारांसोबतच - सुनील तटकरे

राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस पक्षाला गळती लागली असुन आमदार, नेते भाजप व शिवसेन पक्षात प्रवेश घेत आहेत. अशातच तटकरे यांनी चंद्रकांत पाटील यांची भेट घेतल्याने सुनील तटकरेही भाजपात जाणार का? अशी चर्चा रंगण्यास सुरुवात झाली होती.

राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे

रायगड -राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांनी मंगळवारी 30 जुलैला प्रदेशाध्यक्ष, महसूल व सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली. त्यामुळे सुनील तटकरेही भाजपात जाणार का अशी चर्चा रंगण्यास सुरुवात झाली. त्यामुळे सुनील तटकरेही भाजपच्या वाटेवर, अशा वावड्या उठण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, रायगडच्या विकास कामासाठी मी चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली असून मी सदैव शरद पवार यांच्यासोबत ठाम राहणार आहे. त्यामुळे अफवांवर विश्वास ठेवू नका, असे सुनील तटकरे यांनी एका व्हिडिओद्वारे जाहीर केले. त्यामुळे या उठलेल्या वावड्यावर पर्दा पडला आहे.

अफवांवर विश्वास ठेवू नका, असे सुनील तटकरे यांनी एका व्हिडिओद्वारे जाहीर केले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस पक्षाला गळती लागली असुन आमदार, नेते भाजप व शिवसेन पक्षात प्रवेश घेत आहेत. अशातच तटकरे यांनी चंद्रकांत पाटील यांची भेट घेतल्याने सुनील तटकरेही भाजपात जाणार का अशी चर्चा रंगण्यास सुरुवात झाली. मात्र, यावर सुनील तटकरे यांनीच पडदा टाकला असून रायगडच्या विकास कामाबाबत चर्चा करण्यासाठी मी चंद्रकांत पाटील यांना भेटायला गेलो होतो. तसेच पर्यटन मंत्री जयकुमार रावळ, शिवसेनेचे मंत्री दादा भुसे तसेच प्रधान सचिव, विविध खात्याचे सचिव यांचीही भेट मी घेतली आहे, असे तटकरे यांनी स्पष्ट केले आहे.

रायगडचे खासदार म्हणून निवडून गेलेले सुनील तटकरे हे रायगडच्या विकासाबाबत दिल्लीतील मंत्र्याची भेट घेत आहेत. केंद्रीय पर्यटन मंत्री प्रल्हाद सिंग पटेल, रेल्वे मंत्री पियुष गोयल, आयुष केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची तटकरे यांनी भेट घेऊन जिल्ह्यातील विविध विकास कामाबाबत चर्चा केल्याचे सांगितले आहे. जिल्ह्यातील सागरी मार्ग, महामार्ग, क्रीडा, पर्यटन, रुग्णालय सेवा या विषयावर संबंधित मंत्र्याशी सुनील तटकरे यांनी चर्चा केली. त्यामुळे सुनील तटकरे यांची भाजपकडे वाढलेली जवळीक पाहता भाजप प्रवेशाची चर्चा रंगू लागली होती.

मात्र, माध्यमातुन कोणीतरी अफवा पसरविण्याचा प्रयत्न केला असून ते गैर आहे. माझी निष्ठा आणि विचार शरद पवार यांच्याबरोबर आहे. त्यामुळे अफवा पसरण्याचा प्रयत्न करू नका. शरद पवार यांच्या नेतृत्वाने पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा फिनिक्स पक्षासारखा भरारी मारेल, असे सुनील तटकरे यांनी आपल्या व्हिडिओत म्हटले आहे.

Last Updated : Jul 31, 2019, 8:29 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details