रायगड - दिवंगत माजी मुख्यमंत्री ए. आर. अंतुले यांचे चिरंजीव नावेद अंतुले यांनी आज (बुधवार) मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या उपस्थिीतीत शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नावेद अंतुले यांना शिवबंधन बांधले.
नावेद अंतुले यांचा शिवसेनेत प्रवेश - loksabha
अंतुले रायगड लोकसभा मतदारसंघातील युतीचे उमेदवार अनंत गीते यांचा प्रचार करणार आहेत. रायगडमध्ये अंतुले कुटुंबाला मानणारा एक मोठा वर्ग आहे. अंतुले कुटुंब शिवसेनेत आल्यामुळे शिवसेनेचा रायगड लोकसभा मतदारसंघ आणखी मजबूत झाला आहे
नावेद अंतुले यांचा शिवसेनेत प्रवेश
अंतुले रायगड लोकसभा मतदारसंघातील युतीचे उमेदवार अनंत गीते यांचा प्रचार करणार आहेत. रायगडमध्ये अंतुले कुटुंबाला मानणारा एक मोठा वर्ग आहे. अंतुले कुटुंब शिवसेनेत आल्यामुळे शिवसेनेचा रायगड लोकसभा मतदारसंघ आणखी मजबूत झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुनील तटकरे यांच्यामुळेच मला शिवसेनेत येण्याची संधी मिळाली. निवडणुकीच्या निकालानंतरच काय फायदा झाला याचा प्रत्यय येईल, असे नावेद अंतुले म्हणाले.