महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

...तर 1857 चा उठाव पुन्हा जनतेतून होईल - उदयनराजे भोसले - PM

पंतप्रधान मोदी हे सर्व मुख्य संस्था आरबीआय, ईडी, सीबीआय स्वतःच्या खिशात घेऊन फिरत असल्यासारखे वागत आहेत. निवडणूक आयोगही सरकार म्हणेल तसे वागत आहे. त्यामुळे 1857 साली झालेला बंड पुन्हा एकदा होऊन जनतेचा उद्रेक होऊ शकतो, असा खरपूस समाचार खासदार भोसले यांनी भाजप सरकारचा घेतला.

उदयनराजे भोसले

By

Published : Jun 6, 2019, 1:50 PM IST

रायगड- पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भीती दाखवून राज्य करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे 1857 चा जसा उठाव झाला तसा उठाव होण्यास वेळ लागणार नसल्याचे सांगत खासदार उदयनराजे भोसले यांनी भाजप सरकारचा समाचार घेतला आहे. यावेळी शिवस्मारक, ईव्हीएम घोटाळ्यावरून त्यांनी भाजप सरकारवर जोरदार टीका केली आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 346 व्या शिवराज्याभिषेक सोहळा रायगडावर आज (गुरुवार) पार पडला. यावेळी खासदार उदयनराजे भोसले हे रायगडावर येऊन छत्रपती शिवाजी महाराजांना मुजरा केला. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

मी आतापर्यत समाजकारण करत आलो आहे. लोकांसाठी केसेस स्वतःवर घेतल्या आहेत. लोकांसाठी आम्ही कटिबद्ध आहोत. मात्र, पंतप्रधान मोदी हे सर्व मुख्य संस्था आरबीआय, ईडी, सीबीआय स्वतःच्या खिशात घेऊन फिरत असल्यासारखे वागत आहेत. निवडणूक आयोगही सरकार म्हणेल तसे वागत आहे. त्यामुळे 1857 साली झालेला बंड पुन्हा एकदा होऊन जनतेचा उद्रेक होऊ शकतो, असा खरपूस समाचार खासदार भोसले यांनी भाजप सरकारचा घेतला.

ABOUT THE AUTHOR

...view details