अलिबाग (रायगड) - लंडन येथून परतलेल्या एका व्यक्तीला अलिबाग येथील जिल्हा सरकारी रग्णालयातील विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. 18 मार्चला त्या व्यक्तीला सुरुवातीला सारंग विश्रामगृहातील निगरानी कक्षात ठेवण्यात आले होते. त्यानंतर ताप आणि सर्दीचा त्रास जाणवू लागल्याने 19 मार्चला विलीगीकरण कक्षात दाखल करण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. प्रमोद गवई यांनी दिली.
अलिबागच्या एकाला ठेवले विलगीकरण कक्षात हेही वाचा -covid 19: परदेशातून परतल्याची माहिती लपवणाऱ्या 'त्या' डाॅक्टरला नोटीस...
गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा मोठ्या प्रमाणात जगभरातील देशांमध्ये प्रसार झाला आहे. त्यामध्ये अमेरिका, लंडन, दुबई यासह अन्य देशांचा प्रामुख्याने समावेश आहे. परदेशामध्ये कामानिमीत्त तसेच शिक्षणासाठी नागरिक गेलेले आहेत. त्या देशातही कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्याने भारतातील नागरिक आता परत आपल्या मायदेशामध्ये परतत आहेत. देशातील सर्वच विमानतळांवर येणाऱ्याची तपासणी करण्यात येत आहे. रायगड जिल्ह्यातही 327 जण परदेशातून दाखल झाले आहेत. या सगळ्यांना खबरदारीचा उपाय म्हणून, जिल्हा प्रशासनाकडून त्यांना जिल्ह्यात स्थापन करण्यात आलेल्या निगरानी कक्षात ठेवण्यात येते आहे.
लंडन येथून काही दिवसांपूर्वी सदरची व्यक्ती मायदेशात परतली होती. 18 मार्च रोजी तीला अलिबाग येथील सारंग विश्राम गृहातील निगरानी कक्षात डॉक्टरांच्या देखरेखीखाली दाखल करण्यात आले होते. त्यानंतर तीला ताप आणि सर्दीचा त्रास जाणवल्याने १९ मार्च रोजी जिल्हा सरकारी रुग्णालयातील विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. तीची प्रकृति स्थिर राहील्यास लवकरच जनरस वार्ड मध्ये शिफ्ट करणयात येईल मात्र तसेच काही गंभीर आढळल्यास मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात पाठवण्यात येणार आहे अशी माहिती डॉ. गवई यांनी दिली.