पनवेल - मनसे पक्षावर राग असल्याने पनवेलमधील भाजपच्या नगरसेवकाने मनसेच्या कार्यकर्त्यावर प्राणघातक हल्ला केला. विजय चिपळेकर असे भाजपच्या नगरसेवकाचे नाव असून ते पनवेल महापालिकेमधील कामोठे भागातील नगरसेवक आहेत. २९ एप्रिलला रात्री १२ वाजण्याच्या सुमारास चिपळेकर यांनी मनसेचे कार्यकर्ते प्रशांत जाधव यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. यावेळी चिपळेकर यांच्यासोबत आठ ते दहा कार्यकर्ते होते.
मनसेवर राग; भाजप नगरसेवकाचा मनसैनिकावर प्राणघातक हल्ला (व्हिडिओ) - beaten
सोमवरी लोकसभा निवडणुकीचा चौथा टप्पा पार पडला. त्यांनतर या निवडणुकीदरम्यान एकमेकांप्रती असलेला द्वेष विकोपाला गेला. यातून हा हल्ला करण्यात आला.
सोमवरी लोकसभा निवडणुकीचा चौथा टप्पा पार पडला. त्यांनतर या निवडणुकीदरम्यान एकमेकांप्रती असलेला द्वेष विकोपाला गेला. यातून हा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यानंतर विजय चिपळेकर आणि त्यांचे साथीदार फरार झाले आहेत. गुन्हा नोंद होऊ नये यासाठी स्थानिक कामोठे पोलीस ठाण्यावर दबाव आणत असल्याची चर्चा आहे.
“वैयक्तिक कारण पुढे करत मनसेवर असलेल्या रागामुळे भाजप नगरसेवक विजय चिपळेकर यांनी प्रशांत जाधव यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. मतदान संपल्यानंतर नियोजनबद्ध पद्धतीने हा हल्ला केला आहे.”, अशी प्रतिक्रिया मनसे वाहतूक सेनेचे उपाध्यक्ष आणि प्रशांत जाधव यांचे भाऊ महेश जाधव यांनी दिली आहे.