रायगड : महाड शहरातील काजळपुरा परिसरात असलेली तारिक गार्डन ही पाच मजली इमारत कोसळून १० जणांचा मृत्यू झाला. तर, अनेकजण गंभीर जखमी झाले. मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. तसेच, या घटनेतील मृतांच्या वारसांना 5 लाखांची मदत आणि जखमींना 50 हजार रुपये आणि उपचारखर्च शासनामार्फत केला जाणार असल्याचे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
'महाड दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना पाच लाखांची मदत; आरोपींची गय केली जाणार नाही' - raigad building collapse raigad news
महाड इमारत दुर्घटनेतील मृत व्यक्तींच्या कुटुंबीयांना पाच लाखाची मदत तसेच, जखमींना पन्नास हजार रुपये आणि उपचाराचा खर्च हा शासनामार्फत केला जाणार आहे. तर, दोषींवर कारवाई केली जाणार असून कोणाचीही गय केली जाणार नाही, असे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितले
रायगड जिल्ह्यातील महाड इथे तारिक गार्डन नावाची 5 मजली इमारत कोसळून मोठी दुर्घटना घडली. या इमारतीत यात 47 कुटुंब राहत होते. या घटनेत 10 जणांचा नाहक बळी गेला तर, अनेकजण गंभीर जखमी झाले असून दोषी बिल्डर आणि अधिकारी याच्यांवर कठोर कारवाई केली जाणार आहे. बिल्डरने निकृष्ट दर्जाचे काम करून निष्पाप नागरिकांचा बळी घेतला आहे. त्यामुळे कोणाचीही गय केली जाणार नाही. या दुर्घटनेत बळी गेलेल्याच्या वारसांना पाच लाख रुपये तर जखमींना पन्नास हजार रुपये आणि उपचाराचा खर्च हा शासनामार्फत केला जाणार आहे. तसेच जे रहिवासी बेघर झाले आहेत त्यांनाही विशेष बाब म्हणून मदत देण्याचा निर्णय कॅबिनेट बैठकीत घेतला जाईल, असे विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.
दरम्यान, महाड शहरातील काजळपुरा परिसरात असलेली तारिक गार्डन ही पाच मजली इमारत सोमवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास कोसळली. या घटनेत 10 जणांचा मृत्यू झाला असून अनेकजण जखमी झाले आहेत. इमारतीच्या ढिगाऱ्यात सुमारे अनेक जण अडकल्याची माहिती मिळाली आहे. इमारतीत 47 कुटुंबं राहत होती. स्थानिक प्रशासन आणि नागरिकांकडून बचावकार्य सुरू आहे.