महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

खालापूरमध्ये बंधारे बांधण्यासाठी मंत्रालयात बैठक - Khalapur

कर्जत तालूक्यातील (23) बंधारे व खालापूर(6) बंधारेची कामे तात्काळ सुरु करण्यासाठी कार्यारंभ आदेश दिले आहेत. तरी ती कामे त्वरित हाती घेण्याबाबत कोकणातील योजनाचे मापदंड वाढविणे इत्यादी मागण्या बाबतीत आमदार थोरवें फारच आग्रही होते.

Khalapur
मंत्रालयात बैठक

By

Published : Sep 9, 2021, 10:19 PM IST

कर्जत -खालापूर तालूक्यातील सिमेंट काँक्रीट बंधारे, उच्च पातळी बंधारे बाबत शंकरराव गडाख, मंत्री मृद व जलसंधारण विभाग यांच्या अध्यक्षतेखाली बैठक 9 सप्टेंबर रोजी संपन्न झाली. यात कर्जत खालापूरचे आमदार महेंद्र थोरवे यांनी जलविज्ञान विभाग नाशिक यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. बंधाऱ्यासाठी पाणी उपलब्धता प्रमाणपञ प्राप्त केल्याबद्दल मंत्र्यांनी आमदार थोरवेंचे अभिनंदन केले.

तर कर्जत तालुक्यात दरवर्षी होणारी भीषण पाणी टंचाई लक्षात घेता तत्काळ दोन उच्च पातळी बंधाऱ्याचे सर्वेक्षण तसेच 28/2/20 चे पञ जाचक व वेळ खाऊ रद्द करण्याची विनंती आमदार महेंद्र थोरवे यांनी मंत्री महोदयांकडे केली.

बंधारेंचे काम सुरू करण्याचे आदेश

कर्जत तालूक्यातील (23) बंधारे व खालापूर(6) बंधारेची कामे तात्काळ सुरु करण्यासाठी कार्यारंभ आदेश दिले आहेत. तरी ती कामे त्वरित हाती घेण्याबाबत कोकणातील योजनाचे मापदंड वाढविणे इत्यादी मागण्या बाबतीत आमदार थोरवें फारच आग्रही होते. मंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सर्व मागण्या मंजूर करण्याचे आदेश दिले. या बैठकीस अतिरिक्त मुख्य सचिव नंदकुमार, कुशीरे, कार्यकारी संचालक गिते, नलवाड इत्यादी अधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा -पुण्यापाठोपाठ मुंबईतही गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जमावबंदी

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details