रायगड - कोरोनाच्या वाढत्या रुग्ण संख्येच्या अनुषंगाने शासनाने पुन्हा एकदा 30 एप्रिल पर्यत राज्यात मिनी लॉकडाऊन जाहीर केले आहे. अत्यावश्यक सेवेची दुकाने सोडता इतर दुकाने बंद करण्याचे आदेश शासनामार्फत जिल्हा प्रशासनाने लागू केले आहेत. मात्र जिल्ह्यात कडक निर्बंध लागू केले असतानाही शहरातील बहुतांश दुकाने सुरू आहेत. त्यामुळे पहिल्याच दिवशी लॉकडाऊनचा फज्जा उडाल्याचे पहायला मिळत आहे.
इतर दुकानेही खुली
जिल्ह्यात शासनाच्या आदेशानुसार कडक निर्बंध लागू केले आहेत. मेडिकल, दूध, फळे, किराणा दुकान खुली ठेवून इतर दुकाने सोमवार ते शुक्रवार पर्यत बंद ठेवण्याचे आदेश प्रशासनाने काढले आहे. तर शनिवार आणि रविवार पूर्ण लॉकडाऊन जाहीर केले आहे. कोणती दुकाने खुली ठेवायची आणि कोणती बंद करायची याबाबत व्यापाऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाल्याचे पहायला मिळत आहे. त्यामुळे पहिल्याच दिवशी बाजरपेठेतील सर्व दुकाने खुली असल्याचे चित्र आहे.
लॉकडाऊनमध्ये शासकीय आणि खाजगी प्रवासी वाहतुक सुरळीत सुरू आहे. कोरोनाचे नियम पाळून प्रवास सुरू आहे. मात्र नियमाचे उल्लंघन करत खाजगी प्रवासी वाहतुक सुरू असल्याचे दिसून येत आहे.
प्रशासनाच्या आदेशाचा उडाला फज्जा