रायगड - अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार केल्याप्रकरणी सावत्र पित्याला अलिबाग येथील जिल्हा सत्र न्यायालयाने दोषी ठरवून आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली आहे.
अत्याचारप्रकरणी सावत्र पित्याला आजन्म कारावास - Alibaug Session Court
अलिबाग जिल्हा सत्र न्यायालयाने सदरील इसमाला दोषी ठरवून आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली आहे.
सगीर मोहम्मद खान असे या आरोपीचे नाव असून हा खालापूर तालुक्यातील आहे. शिक्षा सुनावण्यात आरोपी हा पीडित मुलीचा सावत्र बाप आहे. त्याने १५ फेब्रुवारी २०१५ ते २५ जून २०१६ या कालावधीत या अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार केला. ही बाब पीडित मुलीच्या आईच्या लक्षात आल्यावर त्यांनी तात्काळ खालापूर पोलीस ठाण्यात सगीर खान विरोधात तक्रार नोंदवली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला तातडीने ताब्यात घेतले. त्यानंतर तपास पूर्ण करून त्याच्याविरोधात सत्र न्यायालयात दोषारोपपत्र देखील दाखल केले.
या खटल्याची सुनावणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही.एम. मोहिते यांच्या न्यायालयात झाली. सरकार पक्षातर्फे अतिरिक्त शासकीयअभियोक्ता अॅड. अश्विनी बांदिवडेकर-पाटील यांनी सात साक्षीदारांची साक्ष नोंदविली. उलट तपासणीत आरोपीच्या भावाने उत्तरप्रदेशमधील जमीन नावावर करण्याचे आमिष दाखवून साक्ष फिरविण्यास सांगितले होते. त्यामुळे या केसमध्ये फिर्यादी व पीडित मुलगी फितूर झाल्या होत्या. परंतु उलट तपासणीत आरोपीने वारंवार अत्याचार केल्याचे कबूल केले. अॅड. अश्विनी बांदीवडेकर यांनी न्यायालयासमोर केलेला युक्तीवाद ग्राहय धरून सत्र न्यायालयानेआरोपी सगीर मोहम्मद खान याला दोषी ठरवूनआजन्म कारावास, तीन हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. तसेच दंडाची रक्कम पीडित मुलीला देण्याचे आदेश दिले.