महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कुरूळ ग्रामपंचायत राबविणार कन्या सन्मान योजना; रायगडमधील पहिलीच ग्रामपंचायत - scheme

कुरूळ ग्रामपंचायतीच्या हद्दीत २० वर्षांपासून वास्तव्य करीत असलेल्या कुटुंबातीळ महिलेस जर पहिले अपत्य कन्या असेल तर, त्या मुलीच्या नावे ग्रामपंचायत २ हजार रुपये मुदत ठेव ठेवणार.

कुरूळ ग्रामपंचायत राबविणार कन्या सन्मान योजना

By

Published : May 29, 2019, 11:41 AM IST

रायगड- अलिबाग तालुक्यातील कुरूळ ग्रामपंचायतीमध्ये जन्माला येणार्‍या मुलींसाठी कुरूळ कन्या सन्मान योजना राबविण्यात येणार आहे, अशी माहिती कुरूळ ग्रामपंचायतीचे सरपंच अ‍ॅड. जर्नादन पाटील यांनी मंगळवारी (दि. २८) पत्रकार परिषदेत दिली. अशी योजना राबविणारी कुरुळ ग्रामपंचायत ही पहिलीच असल्याने इतर ग्रामपंचायतींनी याचा आदर्श ठेऊन ही योजना सुरू करणे गरजेचे आहे.

कुरूळ ग्रामपंचायतीच्या हद्दीत २० वर्षांपासून वास्तव्य करीत असलेल्या कुटुंबातीळ महिलेस जर पहिले अपत्य कन्या असेल तर, त्या मुलीच्या नावे ग्रामपंचायत २ हजार रुपये मुदत ठेव ठेवणार. अठराव्या वर्षी मुलीला किमान १८ हजार रुपये मिळतील. १ एप्रिल २०१९ पासून ही योजना लागू होईल, अशी माहिती सरपंच अ‍ॅड. जनार्दन पाटील यांनी यावेळी दिली.

कुरुळ ग्रामपंचायतीमध्ये महिलांचे प्रमाण जास्त आहे. तसेच मुलगी नको म्हणून अनेकजण गर्भाशयातच मुली मारल्या जातात. त्यामुळे नव्याने जन्म घेणाऱ्या मुलींना सन्मानाने जगता यावे, तसेच मुलीचे प्रमाण वाढावे यादृष्टीने कुरुळ ग्रामपंचायतीने सर्वसाधारण सभेत एकमुखाने या योजनेला पाठींबा दिला आहे.

कुरूळ ग्रामपंचायत हद्दीत विविध विकास कामे हाती घेण्यात आली आहेत. तलावातील गाळ काढण्याचे काम सुरू करण्यात आले असून तलावाचे सुशोभिकरण करण्यात येणार आहे. याच तलावात नौकानयन सुरू करण्याचा आमचा प्रयत्न आहे. ग्रामपंचायतीची स्वतःची पाणीपुरवठा योजना राबविण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत, अशी माहिती अ‍ॅड. पाटील यांनी दिली. ग्रामपंचायत सदस्य मनोज ओव्हाळ, आकाश घाडगे, भूषण बिर्जे, अवधूत पाटील यावेळी उपस्थित होते.

ABOUT THE AUTHOR

...view details