रायगड- मागील चारवर्षापासून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आरपीआय )भाजप - सेना युती सोबत आहे. तरीही कोकणातील आरपीआय कार्यकर्त्यांना सत्तेत वाटा देण्यात आलेला नाही. त्यामुळे कोकणातील कार्यकर्ते नाराज आहेत.म्हणून कोकणातील कार्यकर्ते प्रचारात उतरलेले नाहीत. त्यामुळे ४एप्रिलला कार्यकर्त्यांच्या व्यथापक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्याकडे बोलून दाखवणार आहेत. त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर निर्णय जाहीर करणार असल्याचे आरपीआय कोकण प्रदेशाध्यक्ष जगदीश गयाकवाड यांनी सांगितले. अलिबाग येथे पत्रकार परिषदेत गायकवाड बोलत होते.
पुढे बोलताना गायकवाड म्हणाले, की रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या तीनही जिल्ह्यांमध्ये आरपीआयची ताकद आहे. आम्ही आजही युती सोबतच आहोत. परंतु मागील ४ वर्षात सेना-भाजपने कोकणातील कार्यकर्त्यांना सत्तेत वाटा दिला नाही. आमच्या पक्षाला कोकणातील किमान एक विधान सभेची जागा सोडावी,जिल्हा परिषदेत जागा मिळावी,जिल्हा नियोजन समितीत सदस्य मिळावे, अशा आमच्या अपेक्षा आहेत. त्या पूर्ण झालेल्या नाहीत, अशी नाराजी गायकवाड यांनी नाराजी यावेळी व्यक्त केली.