रायगड-खोपोली येथील बांधकाम व्यवसायिक हसमुख राठोड यांनी माजी सैनिक भरत काकडे यांच्याकडून प्रोजेक्टमध्ये एक गाळा देण्यासाठी 15 लाख रुपये बुकिंग रक्कम म्हणून घेतले होती. मात्र, प्रकल्पाला विलंब होत नसल्याने माजी सैनिकाने पोलिसात तक्रार केली. या प्रकरणी खोपोली पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बांधकाम व्यवसायिक हसमुख राठोड यांच्याकडून प्रोजक्टला उशीर होत आहे. त्यामुळे माजी सैनिक भरत काकडे यांनी फसवणूक केल्याचा दावा केला. याबाबत चर्चा केल्यानंतरही एकमत न झाल्याने बिल्डर हसमुख राठोड यांच्याविरोधात खोपोली पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. यावर राठोड यांना जामिन न मिळाल्याने त्यांना गुरुवारी अटक करण्यात आली आहे.
हेही वाचा-अंबाजोगाईत जुन्या वादातून तरूणाचा खून; दहा दिवसातील दुसऱ्या घटनेनं शहर हादरले