रायगड - खालापूर तालुका पोलीस पाटील संघाची सर्वसाधारण सभा शनिवार दिनांक 17 जूलै रोजी सकाळी 11 वाजता खालापूर पोलीस ठाण्यात पार पडली. खालापूर उपविभागीय पोलिस अधिकारी संजय शुक्ला यांच्या अध्यक्षतेखाली तसेच खालापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक अनिल विभूते यांच्या मार्गदर्शनाखाली ही सभा पार पडली. यावेळी कोरोनामुळे शहीद झालेल्या पोलीस पाटलांच्या कुटुंबियाना सांत्वनपर अर्थिक मदत करत श्रध्दाजंली वाहण्यात आली. ढेकू येथील सम्राट सुर्वे यांच्या कुटुंबाला एक लाखाचा चेक दिल्याने खालापूर पोलीस व सर्व पोलीस पाटलांच्या कार्याचे कौतुक होत आहे.
वर्दीतील दर्दी.. खालापूर पोलिसांच्या मदतीने कोरोनाने मृत पोलीस पाटलांच्या कुटुंबाला एक लाखाची मदत - खालापूर पोलीस पाटील सर्वसाधारण सभा
खालापूर तालुका पोलीस पाटील संघाची सर्वसाधारण सभा आज पार पडली. यावेळी कोरोनामुळे शहीद झालेल्या पोलीस पाटलांच्या कुटुंबियाना सांत्वनपर अर्थिक मदत करत श्रध्दाजंली वाहण्यात आली.
कोरोना काळात खालापूर पोलिसांचे कार्य कौतुकास्पद -
पोलीस म्हटलं की, अनेकांच्या मनात भीती निर्माण होत असते. परंतु पोलिसांच्या खाकी वर्दीतही देव माणूस दडला असल्याचे अनेकदा पाहायला मिळत आहे. खालापूर पोलिसांनी कोरोना काळात केलेली उल्लेखनीय कामगिरीबद्दल सर्व खालापूरकरांनी कौतुक केले असल्याने खाकी वर्दीतील देव माणूस म्हणून त्याच्या कार्याची प्रचिती खालापूरकरांनी पाहिली असताना याकाळात खालापूर पोलिसांनी पाच गावे दत्तक घेऊन आदर्श निर्माण करीत विधवा महिला मदत, विधवा महिलेला घरावर छप्पर देणे असे अनेक कार्य केल्याने खालापूर पोलिसांची कामगिरी उल्लेखनीय असताना 17 जूलै रोजी खालापूर पोलीस ठाणे प्रशासन व पोलीस पाटील संघ यांच्या सहकार्यातून कोरोनाने मृत झालेल्या ढेकू येथील पोलिस पाटील सम्राट सुर्वे यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत व्हावी म्हणून एक लाखाचा धनादेश देत सांत्वन केल्याने खालापूर पोलिसांच्या कार्याचे कौतुक होत आहे.
मृत पोलीस पाटील सम्राट सुर्वेच्या कुटुंबाला मदतीचा हात -
तर यावेळी कोरोना व इतर कारणामुळे शहीद झालेल्या पोलीस पाटलांना श्रध्दांजली वाहून कोरोनामुळे शहीद झालेल्या पोलीस पाटलांच्या कुटुंबियाना सांत्वनपर अर्थिक मदत करण्यात आली. पोलिस पाटलांसाठी विमा योजनेची माहिती तर पोलीस पाटलांचे नुतनीकरण व समस्यांवर मनोगत, तालुका कार्यकारणी जाहीर करणे असा समारंभ पार पडल्याने पोलिस पाटलांमध्ये उत्साह संचारला होता.
याप्रसंगी उपविभागीय पोलीस अधिकारी संजय शुक्ला, पोलीस निरिक्षक अनिल विभूते, पोलीस पाटील संघ महाराष्ट्र प्रदेश सचिव कमलाकर मांगळे, रायगड जिल्हाध्यक्ष हरिश्चंद्र दुदसकर, जिल्हा सचिव विकास पाटील, पनवेल तालुका अध्यक्ष मिलिंद पोपटे, उपाध्यक्ष संतोष गायकर, खालापूर तालुका अध्यक्ष अनंत ठोंबरे, माजी अध्यक्ष राजू केदारी, सचिव पंकज देशमुख आदीप्रमुखासह रसायनी - खालापूर व खोपोली पोलीस ठाणे हद्दीतील सर्व पोलीस पाटील बंधू-भगिनी उपस्थित होते.