रायगड - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या टाळेबंदीत शाळाही बंद होत्या. टाळेबंदीच्या काळात ऑनलइन शिक्षण सुरूच होते. मात्र, याचा सर्वाधिक फटका हा विद्यार्थ्यांच्या शारीरिक व मानसिक आरोग्यावर झाला आहे. आता शाळा सुरू झाल्याने विद्यार्थ्यांच्या रोजच्या दिनक्रमात बदल होऊ शकतात. कोरोनामुळे विद्यार्थ्यांच्या बदललेल्या दिनक्रमाबाबत पुढे काय उपाययोजना कराव्यात याबाबत क्रीडा शिक्षक, बालरोग तज्ज्ञ, मानसोपचार तज्ज्ञ यांनी 'ईटीव्ही भारत'च्या माध्यमातून आपले मत मांडले.
मुलांसोबत पालकांची बैठक घ्या - डॉ. राजीव धामणकर
कोरोनाने शाळातील वर्ग ऑनलाइन सुरू असल्याने मुलेही मोबाईलमध्ये जास्त गुंतत आहेत. टीव्ही पाहू लागली आहेत. कोरोना असल्याने पालक मुलांना बाहेरही खेळण्यास पाठवत नव्हते. त्यामुळे मुलं एकलकोंडी झाली आहेत. घरात बसून मुलांचे वजन वाढू लागले, चिडचिडी झाली असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे मुलांना रोज गोष्टीचे पुस्तक, पेपर वाचण्यास द्या, त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारा, मित्रांसोबत ग्रुप तयार करून प्रत्येक पालकांनी त्यांच्याशी संवाद साधा. आता शाळा सुरू होत असल्याने त्यांच्या दिनचर्येत फरक पडणार आहे. मुलांना मैदानी खेळही खेळण्यास प्रवृत्त करा, असे मत अलिबागमधील प्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ डॉ. राजीव धामणकर यांनी व्यक्त केले आहे.
मुलांना वेळ द्या, त्यांच्या कलाने घ्या - डॉ. अमोल भुसार