महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

भाजीपाल्यांचे भाव भिडले गगनाला; गृहणींचे बजेट कोलमडले

अवकाळी पावसामुळे शेतकऱ्याचे अतोनात नुकसान झाले आहे. पावसाचा फटका भाजीपाल्यांनाही बसला आहे. त्यामुळे बाजारात भाजीपाल्यांची आवक घटली आहे. याचा फटका भाजी विक्रेत्यांसह सर्वसामान्य ग्राहकांना बसत आहे.

भाजीपाल्यांचे भाव वाढल्याने ग्राहक चिंतेत

By

Published : Nov 4, 2019, 12:24 PM IST

Updated : Nov 4, 2019, 6:52 PM IST

रायगड- अवेळी पडत असलेल्या पावसाने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. पावसाचा फटका भाजीपाल्यांनाही बसला आहे. त्यामुळे बाजारात भाजीपाल्यांची आवक घटली आहे. याचा फटका भाजी विक्रेत्यांसह सर्वसामान्य ग्राहकांना बसत आहे. भाजी महाग झाल्याने घरातील गृहिणींचे बजेट कोलमडले आहे. त्यामुळे कुटुंबांना आता एकाच भाजीवर अवलंबून राहावे लागत असल्याचे चित्र आहे.

रायगड जिल्ह्यात भाजीपाल्यांचे भाव गगनाला भिडले

पावसाळा ऋतू संपून आता ३ महिने उलटले आहे. नोव्हेंबर महिना सुरू झाला असून देखील पाऊस पडत आहे. अवेळी पडत असलेल्या पावसामुळे शेतात पाणीच पाणी झाले आहे. पावसामुळे पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. भात शेतीबरोबरच भाजीपाला शेतीला देखील अवकाळी पावसाचा फटका बसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. या परिस्थितीमुळे भाजीपाल्यांची आवक देखील मोठ्या प्रमाणात घटली आहे. परिणामी भाज्यांच्या वाढलेल्या दरांमुळे ग्राहकही त्रस्त झाले आहे.

पालेभाज्यांनी शंभरी गाठली

पश्चिम महाराष्ट्रातून रायगड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात भाजीची आवक होत असते. मात्र, अवकाळी पावसामुळे भाजीचे नुकसान झाले आहे. त्यामुळे भाज्यांची आवक घटली असून भाज्यांचे भाव गगनाला भिडले आहेत. टमाटर, मटार, वांगी, कोथिंबीर, शिमला मिरची, पालेभाजी यासारख्या भाज्यानी शंभरी गाठली आहे. त्यामुळे भाजी बाजारात ग्राहकांची कमी वर्दळ आहे. जिल्ह्यातील स्थानिक शेतकरी आपल्या शेतात मुळा, गवार, तोंडली, कोथिंबीर, वांगी यासारखी भाजी पिकवत असतात. मात्र, पावसामुळे पीकाचे नुकसान झाले. त्यामुळे बाजारात विकण्यास येणाऱ्या भाजीचे भाव वाढले. परिणामी ग्राहकही तोलून मापून भाजी विकत घेत आहे. त्यामुळे भाजी विक्रेत्यांनाही याचा आर्थिक फटका बसत आहे.

गृहिणींना चिंता

भाजीचे भाव वाढल्याने गृहिणींनाही रोज काय भाजी करायची याची चिंता सतावत आहे. त्यामुळे जेवनात रोज दोन भाज्या खानाऱ्यांना आता एका भाजीवर समाधान मानावे लागत आहे. त्यातच मच्छीची आवक घटल्याने मच्छीचे भावही गगनाला भिडले आहेत. त्यामुळे गृहिणींचे जेवणाचे बजेट चांगलेच कोसळले आहे.

Last Updated : Nov 4, 2019, 6:52 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details