महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

विकासाचा मुद्दा घेऊन निवडणुकीला सामोरा जातोय - सुनिल तटकरे

सुनिल तटकरे यांचा २०१४ मध्ये निसटता पराभव झाला होता. यावेळी ते केंद्रीय मंत्री अनंत गीते यांच्याविरोधात लढत आहेत. ईटीव्ही भारतने त्यांच्याशी संवाद साधला. ते म्हणाले, की मी गेल्या ३५ वर्षांपासून समाजसेवा करत आहे. जनतेचे प्रश्न, समस्या सोडविण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे.

By

Published : Mar 31, 2019, 11:59 AM IST

राष्ट्रवादीचे उमेदवार सुनिल तटकरे

रायगड - या लोकसभा निवडणुकीला मी विकासाचा मुद्दा घेऊन सामोरा जात आहे, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे लोकसभेचे उमेदवार सुनिल तटकरे यांनी केले. ते ईटीव्ही भारतच्या प्रतिनिधीशी रायगडमध्ये बोलत होते. माजी मुख्यमंत्री बॅ. ए. आर. अंतुले यांचे पुत्र नावेद यांच्या शिवसेनेत जाण्याने फारसा फरक पडणार नाही, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

नावेद अंतुले यांच्या शिवसेना प्रवेशामुळे फारसा फरक पडणार नसल्याचे तटकरे म्हणाले

सुनिल तटकरे यांचा २०१४ मध्ये निसटता पराभव झाला होता. यावेळी ते केंद्रीय मंत्री अनंत गीते यांच्याविरोधात लढत आहेत. ईटीव्ही भारतने त्यांच्याशी संवाद साधला. ते म्हणाले, की मी गेल्या ३५ वर्षांपासून समाजसेवा करत आहे. जनतेचे प्रश्न, समस्या सोडविण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे. २५ वर्षे विधीमंडळात, ३ वर्षे जिल्हा परिषद अध्यक्ष, ८ वर्षे काँग्रेस युवक अध्यक्ष म्हणून काम करण्याचा मला अनुभव आहे.

केंद्राच्या अनेक योजना जिल्ह्यात पोहोचल्या नाहीत. त्या पोहोचविण्याचा मानस असल्याचे तटकरे म्हणाले. राष्ट्रीय महामार्ग, रेल्वे, बीएसएनएल, सागरी महामार्ग, बेरोजगारी कमी करण्यासाठी प्रकल्प निर्मीती, मच्छीमारांसाठी जेट्टी, कोल्ड स्टोरेज यासारखे प्रश्न सोडविण्यासाठी पुढील ५ वर्षात प्रयत्न करणार असल्याचे तटकरेंनी सांगितले.

माजी मुख्यमंत्री बॅ. ए. आर. अंतुले यांचे पुत्र नावेद यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावर बोलताना तटकरे म्हणाले, की त्यांच्या जाण्याने फारसा फरक पडणार नाही. नावेद यांना पुढे काय मिळेल हे काही दिवसात कळेलच. बॅ. अंतुलेंनी रायगडला पुढे नेण्याचे काम केले. शिवसेना जेव्हा-जेव्हा अंतुलेंच्या विरोधात लढली तेव्हा गीतेंना त्यांच्याविरोधात ओकलेली गरळ लोक विसरले नाहीत असे तटकरे म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details