महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

संतापजनक! जेवणाच्या ताटात मटण कमी वाढले म्हणून पत्नीला जिवंत जाळले

पनवेल शहरा जवळच्या जुई गावात पतीने पत्नीला जिंवत जाळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तब्बल दहा दिवस ही विवाहिता मृत्यूशी झुंज देत होती. अखेर तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

Husband burns wife alive in Panvel
रायगडमध्ये बायकोला जिवंत जाळले

By

Published : Dec 16, 2019, 8:51 PM IST

पनवेल - केवळ जेवणाच्या ताटात मटण कमी वाढले म्हणून रागाच्या भरात पतीने पत्नीच्या अंगावर रॉकेल ओतून तिला पेटवून दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पनवेलमधल्या कामोठेजवळील जुई गावात ही काळीज पिळवटून टाकणारी ही घटना घडली. तब्बल दहा दिवस ही विवाहिता मृत्यूशी झुंज देत होती. अखेर तिची मृत्यूशी झुंज संपली असून तिचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी पतीविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर पती फरार झाला आहे. फरार पतीचा पोलीस तपास करत आहेत.

रायगडमध्ये बायकोला जिवंत जाळले

पनवेलमधल्या कामोठे जवळच असलेल्या जुई गावात हे दांपत्य आपल्या मुलांसोबत राहत होते. 4 डिसेंबरला आरोपी पतीने रात्रीच्या जेवणात मटण बनवण्यासाठी पत्नीला सांगितले होते. त्यासाठी त्याने मटणासाठी लागणारे सर्व साहित्य बाजारातून आणून पत्नीच्या हातात दिले. रात्री हे सगळे कुटुंब मटणाच्या जेवणासाठी बसले होते. आरोपी पतीने त्याच्या ताटात मटण वाढण्यासाठी पत्नीला सांगितले. त्यांनतर जेवणाच्या ताटात तिने मटण कमी वाढले म्हणून आरोपी पतीचा राग मस्तकात गेला. रागाच्या भरात आरोपी पतीने तिच्या अंगावर रॉकेल टाकले व तिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. याहूनही धक्कादायक म्हणजे हा सर्व प्रकार त्यांच्या मुलांच्या डोळ्यादेखत घडला.

या प्रकारानंतर आरोपी पतीने होरपळलेल्या अवस्थेतील पत्नीला डी. वाय. पाटील रुग्णालयात दाखल केले. महिलेची प्रकृती खालावल्याने तिला मुंबई पालिकेच्या सायन येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, दहा दिवसांपासून विवाहितेची मृत्यूशी सुरू असलेली झुंज अपयशी ठरली असून तिचा मृत्यू झाला आहे.

मृत्यूच्या काही तास आधी विवाहितेची जबानी -

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गंभीररीत्या भाजलेल्या विवाहितेने स्टोव्हच्या भडक्याने ही घटना घडल्याचे जबानीत सांगितले होते. मात्र, मृत्यूच्या काही तास आधी दिलेल्या जबाबात पतीने अंगावर रॉकेल ओतून जाळल्याचे स्पष्ट केले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाबासाहेब तुपे यांचे पथक फरार पतीचा शोध घेत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details