पनवेल (रायगड) - पनवेल महानगरपालिका क्षेत्रात कोरोनाग्रस्त रुग्णाची शंभरी पार झाली आहे. या क्षेत्रात सध्या एकूण 107 कोरोनाबाधित रूग्ण आहेत. दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत 39 रुग्ण बरे देखील झाले आहेत. पनवेलमधील बहुतांश कोरोना रुग्ण हे इतरांच्या संपर्कात आल्याने संक्रमणामुळे वाढली आहे. तसेच पनवेलमध्ये एकूण 52 क्षेत्र कोरोना प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आली आहेत. पनवेल महानगरपालिका क्षेत्रात जरी कोरोनाबाधित रुग्णांची जरी शंभरी ओलांडली असली, तरिही ही संख्या नियंत्रित असल्याचा दावा आयुक्त गणेश देशमुख यांनी केला आहे.
पनवेल परिसरात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण इतर क्षेत्रापेक्षा जास्त आहे. त्यामुळेच पनवेलमध्ये कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणमध्ये असल्याचा दावा पनवेल आयुक्त गणेश देशमुखांनी केला आहे. रायगड जिल्हा हा ऑरेंज झोनमध्ये असला, तरिही पनवेल तालुक्यातील कोरोनाबाधित रूग्णांची संख्या पाहता, संभाव्य धोके विचारात घेऊन पनवेल तालुका रेड झोनमध्ये असावा, असा प्रस्ताव पनवेल महानगरपालिकेने रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्याकडे दिला होता. तो मान्य करत पनवेल तालुका आता 'रेड झोन' म्हणून घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे यापूर्वी जे नियम लागू होते, तेच नियम आता पनवेल परिसरात लागू राहणार आसल्याचे पालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी म्हटले आहे.