महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

रायगडमधील हॉटेल व्यावसायिकांना कोरोनाचा फटका; यंदा बुकिंगच नाही - रायगड पर्यटन व्यवसाय

दिवाळी हा सण लॉजिग, रिसॉर्ट, हॉटेल व्यवसायिक याचा कमाईचा असतो. दिवाळीत लॉजिग व्यवसायिकांना महिनाभर आधीच बुकिंग मिळत असते. मात्र, कोरोना महामारीमुळे यंदा व्यवसायिक हे पर्यटकांची वाट पाहू लागले आहेत.

hotel-owner-in-raigad-hit-by-corona
रायगडमधील हॉटेल व्यावसायिकांना कोरोनाचा फटका; यंदा बुकिंगच नाही

By

Published : Nov 13, 2020, 5:08 PM IST

रायगड - कोरोना प्रादुर्भाव हा कमी होण्यास सुरुवात झाल्यानंतर शासनाने हळूहळू टाळेबंदी शिथिल केली आहे. पर्यटनही सुरू झाले आहे. दिवाळी सण हा जिल्ह्यातील पर्यटन व्यवसायाला चालना देणारा आहे, असे असले तरी कोरोना महामारीमुळे यंदा पर्यटकांनी मात्र पाठ फिरवलेली आहे. त्यामुळे पर्यटन व्यावसायिकांची दिवाळी मात्र दिवाळं निघणारी ठरणार आहे.

हॉटेल व्यवसायिक व पर्यटकांची प्रतिक्रिया

लॉजिग, रिसॉर्टमध्ये 20 ते 30 टक्केच बुकिंग

शासनाने टाळेबंदी शिथिल केली आणि पर्यटनही खुले केले. त्यामुळे जिल्ह्यात पर्यटकांची रेलचेल सुरू झाली आहे. दिवाळी हा सण लॉजिग, रिसॉर्ट, हॉटेल व्यवसायिक याचा कमाईचा असतो. दिवाळीत लॉजिग व्यवसायिकांना महिनाभर आधीच बुकिंग मिळत असते. मात्र, कोरोना महामारीमुळे व्यवसायिक हे पर्यटकांची वाट पाहू लागले आहेत. त्यामुळे यावेळी लॉजिग, हॉटेल, रिसॉर्ट व्यवसायिकांना 20 ते 30 टक्केच बुकिंग मिळाली आहे.

खर्च कसा भागवायचा?

रायगड जिल्ह्यात अलिबाग, किहीम, मांडवा, वरसोली, आक्षी, नागाव, रेवदंडा, काशीद, मुरुड, दिवेआगर, हरिहरेश्वर, श्रीवर्धन हे समुद्र किनारे आहेत. याठिकाणी पर्यटक हे मोठ्या संख्येने मौजमजा करण्यास येत असतात. पर्यटक हे वन-डे पिकनिक करून पुन्हा माघारी फिरत आहेत. त्यामुळे वस्तीसाठी येणाऱ्या पर्यटकांची संख्या कमी झालेली आहे. पर्यटक नसल्याने लॉजिग रिसॉर्ट व्यावसायिक हे चिंतेत सापडले आहेत. दिवाळीच्या सुटीत पर्यटक हे मोठ्या संख्येने येईल, अशी आशा बाळगून असणाऱ्या व्यवसायिकांनी कोरोना अनुषंगाने लॉज, रिसॉर्टच्या रूम या सॅनिटाईज केल्या आहेत. कोरोनाच्या अनुषंगाने सर्व नियम पाळले जात आहेत. त्यामुळे सॅनिटाईज करून झालेला खर्च तरी निघणार की नाही, हा प्रश्न व्यवसायिकांना पडला आहे.

लॉजिग, रिसॉर्ट व्यवसायिकांची दिवाळी म्हणजे कही खुशी, कही गम असे चित्र बघायला मिळत आहे. कोरोना संकट असल्याने पर्यटकांची संख्या यावेळी कमी झाली आहे. काही मोजक्याच लॉज, रिसॉर्टला दिवाळीत पूर्ण बुकिंग असले, तरी अनेक ठिकाणी पर्यटकांच्या बुकींगसाठी घासाघीस करावी लागत आहे. रुमचे दर ऐकून पुन्हा पर्यटक फोन करीत नाही. त्यामुळे रिसॉर्ट, लॉजिगचा खर्च कसा भागवायचा, असा प्रश्नही व्यवसायिकांना पडला आहे.

ऐतिहासिक वास्तू पर्यटकांसाठी खुल्या

पर्यटन व्यवसायाशी निगडित असलेल्या छोट्या व्यवसायिकांनाही दिवाळीत फटका बसला आहे. तसेच ऐतिहासिक गड, किल्ले, वास्तु पर्यटकांसाठी खुलेशासनाने समुद्रकिनारी पर्यटन सुरू केले असले, तरी ऐतिहासिक गड, किल्ले, वास्तू यांच्यावर जाण्यास पर्यटकांना बंदी होती. त्यामुळे शिवप्रेमी, ट्रेकिंग, सामाजिक संस्थांनी गड, किल्ले पर्यटनासाठी खुले करण्याची मागणी केली होती. त्यानुसार रायगड जिल्हाधिकाऱ्यांनी गड, किल्ले ऐतिहासिक वास्तू हे कोरोनाचे नियम पाळून पर्यटकांना खुले केले आहेत. त्यामुळे या ठिकाणच्या पर्यटन व्यवसायाला आता चालना मिळणार आहे.

हेही वाचा- दीपावली विशेष : कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरातील 'किरणोत्सव'

ABOUT THE AUTHOR

...view details