रायगड - धुलिवंदन सणावरही कोरोना विषाणूची प्रभाव असल्याचे दिसत आहे. होळी दहन झाल्यानंतर दुसरा दिवस धुलीवंदनाचा असतो. या दिवशी रंगाची उधळण करत हा सण साजरा केला जातो. जिल्ह्यातही धुलीवंदन उत्साहात साजरा केला जात आहे. मात्र, यावर कोरोना विषाणूची दहशत काही प्रमाणात पहायला मिळत होती. दरवर्षी समुद्रकिनारे हे रंगात न्हाहून गेलेले तसेच नागरिकांच्यी गर्दी पहायला मिळते. मात्र, यावर्षी ही गर्दी कमी प्रमाणात पहायला मिळाली.
धुलिवंदन सणावर 'कोरोना' विषाणूची दहशत; समुद्र किनारी पर्यटकांची तुरळक गर्दी
आज सगळीकडे धुलिवंदन सण साजरा होत आहे. मात्र, असे असताना यावेळी कोरोना विषाणूच्या भीतीने पर्यटकांनी याठिकाणी पाठ फिरवली. स्थानिक तसेच तुरळक पर्यटक यांनी एकमेकाला रंग लावून धुलिवंदन सण साजरा करत आहेत. जिल्ह्यातील अलिबाग, वरसोली सारखे समुद्र किनारे हे धुलिवंदनाच्या वेळी बहरलेले असतात. मात्र, यावेळी समुद्र किनाऱ्यावर कमी प्रमाणात गर्दी दिसत होती.
आज सगळीकडे धुलिवंदन सण साजरा होत आहे. मात्र, असे असताना यावेळी कोरोना विषाणूच्या भीतीने पर्यटकांनी याठिकाणी पाठ फिरवली. स्थानिक तसेच तुरळक पर्यटक यांनी एकमेकाला रंग लावून धुलिवंदन सण साजरा करत आहेत. जिल्ह्यातील अलिबाग, वरसोली सारखे समुद्र किनारे हे धुलिवंदनाच्या वेळी बहरलेले असतात. मात्र, यावेळी समुद्र किनाऱ्यावर कमी प्रमाणात गर्दी दिसत होती. तर स्थानिकांनी मात्र धुलिवंदन सण हौसेने साजरा केला.
हेही वाचा -तुम्हीच मुख्यमंत्री आहात, चंद्रकांत पाटलांचा उपमुख्यमंत्र्यांना टोला