रायगड- अलिबाग समुद्रात शनिवारी साधारण चार ते साडेचार मीटरपर्यंत लाटा उसळल्या. समुद्रातील लाटांचा खेळही पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. समुद्रकिनारी जाण्यास बंदी असल्याने पोलिसांनी सुरक्षेच्या दृष्टीने पर्यटकांसह नागरिकांना जाण्यास सांगितले. मात्र, तरीही नागरिकांनी आणि पर्यटकांनी समुद्रातील या लाटांच्या खेळाचा मनमुराद आनंद लुटला.
दोन दिवसांपासून मुसळधार पावसाने रायगडकरांना झोडपून काढले आहे. रात्रीपासून पाऊस पडत असल्याने जिल्ह्यात अनेक भागात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणचे रस्ते बंद होते. शनिवारी समुद्रात साडेचार ते पाच मीटर उंचीच्या लाटा उसळल्या होत्या. त्यामुळे नागरिकांनी दुपारी साडेबारा वाजल्यापासून गर्दी केली होती.