पनवेल- अंगाला हळद, पेहराव हळदीने माखलेला, डोक्यात हळदीची टोपी आणि कपाळावर बांधलेल्या रुईच्या फुलांच्या मुंडावळ्या अशा अवस्थेत लोकशाहीतील मतदानाच्या कर्तव्याचा विसर पडू न देता मावळ लोकसभा मतदारसंघातील पनवेलमधल्या एका नवरदेवाने मतदानाचा हक्क बजावला. अजिंक्य डावलेकर असे या नवरदेवाचे नाव आहे.
आधी मतदान मग विवाह...नवरदेव हळदीच्या अंगाने थेट मतदान केंद्रात - school
अजिंक्यने सर्व गोष्टी बाजूला ठेवत मतदान केले. मतदानाबद्दलची जागृती पाहुन अजिंक्यचे कौतुक केले जात आहे.
नवरदेव अजिंक्य डावलेकर
अजिंक्य पनवेलमधल्या खांदा कॉलनीत सेक्टर १ मधील सुयोग अपार्टमेंटमध्ये राहतो. अजिंक्य खांदा कॉलनीत महात्मा स्कूलइथल्या मतदान केंद्रावर पोहोचला. विवाह ३० तारखेला सकाळी असल्याने नातेवाईकांची घरात रेलचेल होती. तेवढ्यात अजिंक्यने सर्व गोष्टी बाजूला ठेवत मतदान केले. मतदानाबद्दलची जागृती पाहुन अजिंक्यचे कौतुक केले जात आहे. अजिंक्य ३० एप्रिल रोजी श्वेता नावाच्या मुलीसोबत विवाहबद्ध होणार आहे.