रायगड- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन यंत्रणा सतत कार्यरत आहे. शासकीय कार्यालयातील कर्मचारी, अधिकारी यांचीही आरोग्य तपासणी जिल्हाधिकारी राजस्व सभागृहात डॉक्टरांकडून करण्यात येत आहे. जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी सर्व शासकीय अधिकारी, कर्मचारी यांची तपासणी करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार ही आरोग्य तपासणी केली जात आहे.
खबरदारी ! शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांची तपासणी
जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी सर्व शासकीय अधिकारी, कर्मचारी यांची तपासणी करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार ही आरोग्य तपासणी केली जात आहे.
कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन आणि प्रशासन हरतऱ्हेने प्रयत्न करित आहे. आरोग्य यंत्रणेबरोबर जिल्हा आणि पोलीस प्रशासनही काम करीत आहे. शासकीय कार्यालयात येणाऱ्या अधिकारी आणि कर्मचारी यांचाही संपर्क एकमेकांशी येत असतो. यासाठी जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार, कोषागार कार्यालयातील कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी केली जात आहे.
आरोग्य यंत्रणेचे डॉक्टर अधिकारी आणि कर्मचारी यांचे तापमान तपासून कोणता आजार आहे का, याची तपासणी करत आहेत. शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांची तपासणी केली जात असल्याने त्यांच्याही आरोग्याची काळजी जिल्हा प्रशासन घेत आहे. खुद्द जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनीही आपली आरोग्य तपासणी केली आहे, तर पोलीस प्रशासनाच्या अधिकारी आणि पोलिसांचीही तपासणीही केली जाणार आहे.