महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Garbage Burned: जेएनपीटी कचरा विघटन केंद्राबाहेर उघड्यावर कचरा जाळला; नागरिकांच्या आरोग्याला धोका - केंद्रामधील हलगर्जीपणा

Garbage Burned: एनपीटी बंदर आयात निर्यात व्यवसायातून जगभरात आपला ठसा उमटवत आहे. तर हे बंदर देशातील सर्वात मोठे आणि व्यस्त बंदर आहे. या बंदरातून आणि बंदर वासाहतीमधून निघणाऱ्या कचऱ्याचे नियोजन करण्यासाठी बंदराकडून 'कचारा विघटन केंद्र' बांधण्यात आले आहे. या केंद्रामध्ये ओला कचरा आणि सुका कचरा यांचे विघटन करण्याची सोय आहे.

Garbage Burned
Garbage Burned

By

Published : Nov 11, 2022, 5:46 PM IST

रायगड:शेकडो टन कचरा जाळल्याने वातावरणात प्रदूषण झाला आहे. जेएनपीटी बंदराने बांधलेल्या कचरा विघटन केंद्रामधील हलगर्जीपणा समोर आला आहे. कचऱ्याचे विघटन न करता शेकडो टन कचरा उघड्यावर जाळण्याचा पराक्रम येथे करण्यात आला असून येथील परिसरातील नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. तर वातावरणामध्ये 2 दिवसात सतत धुमसणाऱ्या आगीमुळे धुराचे लोळ पसरून प्रदूषण होत आहे.

कचरा विघटन केंद्राबाहेर उघड्यावर कचरा जाळला

नागरिकांच्या आरोग्याला धोकाजेएनपीटी बंदर आयात निर्यात व्यवसायातून जगभरात आपला ठसा उमटवत आहे. तर हे बंदर देशातील सर्वात मोठे आणि व्यस्त बंदर आहे. या बंदरातून आणि बंदर वासाहतीमधून निघणाऱ्या कचऱ्याचे नियोजन करण्यासाठी बंदराकडून 'कचारा विघटन केंद्र' बांधण्यात आले आहे. या केंद्रामध्ये ओला कचरा आणि सुका कचरा यांचे विघटन करण्याची सोय आहे. मात्र या केंद्रामधील हलगर्जीपणा नागरिकांच्या आरोग्याला धोकादायक बनला आहे. येथे जमा झालेला शेकडो टन कचरा केंद्राबाहेरील शेडमध्ये उघड्यावरच जाळण्याचा भयानक प्रकार येथे घडत आहे. दोन दिवसांपासून कचऱ्याचे ढीग पेटून धुमसत असून या कचऱ्यातून निघणाऱ्या धुराचे लोळ वातावरणामध्ये पसरू येथील परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर प्रदूषण निर्माण झाले आहे. यामुळे कचऱ्यातून निघणाऱ्या विषारी धुरामुळे येथील नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.

जेएनपीटी प्रशासनाने ठोस पावले उचलावी:एकीकडे जेएनपीटी स्वच्छतेवर भर देत स्वचेतेसाठी कार्यक्रम राबवर आहे. तर पर्यावरण टिकून राहावे, यासाठी प्रयत्न करत आहे. मात्र दुसरीकडे विघटन केंद्राबाहेर कचऱ्याला लावण्यात आलेल्या आगीकडे दुर्लक्ष करून, पर्यावरणात प्रदूषण पसरवून, नागरिकांच्या जीवाशी खेळत आहे. या गंभीर प्रकाराबाबत जेएनपीटी प्रशासनाने ठोस पावले उचलावीत अशी मागणी आता आसपासच्या ग्रामस्थांकरून केली जात आहे.

केंद्रामधील हलगर्जीपणाजेएनपीटी बंदर आयात निर्यात व्यवसायातून जगभरात आपला ठसा उमटवत आहे. तर हे बंदर देशातील सर्वात मोठे आणि व्यस्त बंदर आहे. या बंदरातून आणि बंदर वासाहतीमधून निघणाऱ्या कचऱ्याचे नियोजन करण्यासाठी बंदराकडून 'कचारा विघटन केंद्र' बांधण्यात आले आहे. या केंद्रामध्ये ओला कचरा आणि सुका कचरा यांचे विघटन करण्याची सोय आहे. मात्र या केंद्रामधील हलगर्जीपणा नागरिकांच्या आरोग्याला धोकादायक बनला आहे. येथे जमा झालेला शेकडो टन कचरा केंद्राबाहेरील शेडमध्ये उघड्यावरच जाळण्याचा भयानक प्रकार येथे घडत आहे. दोन दिवसांपासून कचऱ्याचे ढीग पेटून धुमसत असून या कचऱ्यातून निघणाऱ्या धुराचे लोळ वातावरणामध्ये पसरू, येथील परिसरामध्ये मोठ्याप्रमाणावर प्रदूषण निर्माण झाले आहे. यामुळे कचऱ्यातून निघणाऱ्या विषारी धुरामुळे येथील नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.

जेएनपीटी प्रशासनाने ठोस पावले उचलावी:एकीकडे जेएनपीटी स्वच्छतेवर भर देत स्वचेतेसाठी कार्यक्रम राबवर आहे. तर पर्यावरण टिकून राहावे यासाठी प्रयत्न करत आहे. मात्र दुसरीकडे विघटन केंद्राबाहेर कचऱ्याला लावण्यात आलेल्या आगीकडे दुर्लक्ष करून, पर्यावरणात प्रदूषण पसरवून, नागरिकांच्या जीवाशी खेळत आहे. या गंभीर प्रकाराबाबत जेएनपीटी प्रशासनाने ठोस पावले उचलावीत अशी मागणी आता आसपासच्या ग्रामस्थांकरून केली जात आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details