महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पर्यावरणपूरक बाप्पा.! ३३०० पेन्सिलची आरास, विसर्जनानंतर विद्यार्थ्यांना देणार भेट - महाड

महाड शहरातील गिरीश मोकल यांनी विद्येचा देवता असल्याने गणरायासाठी ३ हजार तीनशे पेन्सिलचा वापर करून सुंदर व सुबक अशी आरास केली आहे. गिरीश मोकल यांनी केलेली ही आरास पाहण्यासाठी गणेशभक्तांची रिघ लागली आहे.

बाप्पाला ३३०० पेन्सिलची आरास

By

Published : Sep 5, 2019, 6:39 PM IST

रायगड- चौसष्ट कला व विद्येत निपुण असलेला गणरायाला विद्येचा देवता म्हटले जाते. गणरायाच्या या कलेनुसार महाड शहरातील गिरीश मोकल यांनी विद्येचा देवता असल्याने गणरायासाठी ३ हजार तीनशे पेन्सिलचा वापर करून सुंदर व सुबक अशी आरास केली आहे. गिरीश मोकल यांनी केलेली ही आरास पाहण्यासाठी गणेशभक्तांची रिघ लागली आहे. गणेश विसर्जन झाल्यानंतर या पेन्सिल गरीब मुलांना वाटण्यात येणार असून त्यातून सामाजिक बांधिलकी जपण्याचा संदेश ही मोकल कुटूंबानी समाजापुढे ठेवला आहे.

माहिती देताना गिरीश मोकल

आपल्या लाडक्या बाप्पासाठी दरवर्षी गणेशभक्त मखरात विराजमान करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या आरास केलेल्या पाहायला मिळतात. पर्यावरणपूरक आरास निर्माण करण्याकडे हल्ली गणेशभक्तांचा कल वाढलेला आहे. अशीच एक अनोखी आरास रायगड जिल्ह्यातील महाडमधील गिरीश मोकल यांच्या कुटुंबांनी तीन हजार तीनशे पेन्सिल पासून साकारली आहे. गणपती बसविण्याच्या टेबलला शिसपेन्सिलने सजविले असून भिंतीवरही पेन्सिलने डिजाईन काढली आहे. तर गणरायाच्या मस्तकाच्या वरती छोट्या बाटल्याचे सजावट केली आहे. पर्यावरणपूरक अशा मखरात गणराया स्थानापन्न झाले आहेत.

गणरायाची सजवलेली आरास साकारण्याचा हेतू म्हणजे जी आरास आपण करतो ती बाप्पाचे विसर्जन झाल्यानंतर बनवलेली आरास एकतर पुढल्या वर्षीसाठी जपून ठेवतो अन्यथा फेकून दिली जाते. मोकल यांनी या आरासमधून समाजाला एक आदर्श देण्याचा प्रयत्न केला आहे. त्या आरासचा काही तरी उपयोग व्हावा म्हणून ही आरास मोकल यांनी साकारली आहे. पेन्सिलपासून बनवलेली ही आरास विसर्जनानंतर मखरासाठी वापरलेल्या या सर्व पेन्सिल गरीब व गरजू विद्यार्थ्यांना वाटण्यात येणार असून त्यातून सामाजिक बांधिलकीही जपली आहे. अशा प्रकारच्या पर्यावरणपूरक आणि सामजिक बांधिलकी जपण्यासारखी आरास नागरिकांनी कराव्यात, असे आव्हान गिरीश मोकल यांनी केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details