महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Mass suicide : फिरण्यास आलेल्या चार पर्यटकांची कॉटेजच्या रुममध्ये आत्महत्या - चार पर्यटकांची सामूहिक आत्महत्या

अलिबागमध्ये फिरण्यास आलेल्या पर्यटकांनी कॉटेजच्या रुममध्ये (in a cottage room) आत्महत्या (Four tourists commit Mass suicide) केल्याची घटना समोर आली आहे. महत्वाचे म्हणजे यात मुलांना विष पाजुन पुरुष व महिलेने गळफास घेतला या घटनेत चारही जणांचा मृत्यू झाला आहे.

suicide in a cottage room
कॉटेजच्या रुममध्ये आत्महत्या

By

Published : May 17, 2022, 8:25 PM IST

Updated : May 17, 2022, 10:01 PM IST

अलिबाग: येथे फिरायला आलेल्या एका पुरुष आणि महिलेने सोबत असलेल्या मुला मुलीची विष पाजून हत्या केली आणि नंतर स्वतः गळफास लावून आत्महत्या (Four tourists commit Mass suicide) केली आहे. शहरातील ब्लोसम कॉटेज मध्ये (in a cottage room) हा प्रकार घडला आहे. हे चौघेही कलंबोली येथील रहिवासी असून 11 मे पासून अलिबागमध्ये वास्तव्यास होते. यातील मृत महिला हरविल्याची फिर्याद तिच्या पतीने 1 मे रोजी कलंबोळी पोलिस ठाण्यात नोंदवली होती. सोमवारी ते बाहेरुन आल्यावर रुम मध्ये गेले मात्र मंगळवारी सकाळ पासून त्यांचा दरवाजा उघडला नाही तसेच त्यांची कोणतीच हालचाल दिसून आली नाही.

दुपारी 3 च्या सुमारास कॉटेज मालकाने दरवाजा उघडला असता मुलांचे मृतदेह बेड वर तर दोघांनी गळफास लावलेला दिसून आला. याप्रकरणी अलिबाग पोलिसांना कळवताच पोलिस तातडीने घटनास्थळी पोहचले पंचनामा करून मृतदेह शव विच्छेदन करण्यासाठी रुग्णालयात नेले असून त्यांच्या कुटुंबीयांना कळविण्यात आले आहे. दरम्यान यातील मृत महिला हरविल्याची फिर्याद तिच्या पतीने 1 मे रोजी कलंबोळी पोलिस ठाण्यात नोंदवल्याची माहिती समोर येत आहे.

Last Updated : May 17, 2022, 10:01 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details