महाराष्ट्र

maharashtra

अलिबागचे माजी आमदार मधुकर ठाकूर यांचे ७४व्या वाढदिवशीच निधन

By

Published : Jul 15, 2021, 9:36 AM IST

माजी आमदार मधुकर ठाकूर यांचे आज (गुरूवार) पहाटे 5 वाजताच्या सुमारास निधन झाले. त्यांच्यावर त्यांच्या मुळ गावी अलिबाग तालुक्यातील सातीर्जे आज दुपारी 2 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Former Alibag MLA Madhukar Thakur passes away
अलिबागचे माजी आमदार मधुकर ठाकूर यांचे निधन

रायगड - अलिबाग-उरण मतदार संघाचे माजी आमदार मधुकर ठाकूर यांचे आज (गुरुवार) पहाटे 5 वाजताच्या सुमारास निधन झाले. ते 74 वर्षांचे होते. आजच म्हणजे 15 जुलै रोजी त्यांचा वाढदिवस होता. मागील 3 ते 4 वर्षांपासून ते आजारी होते.

मधुकर ठाकूर यांनी त्यावेळच्या झिराड ग्रामपंचायतीच्या सरपंच पदापासून आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर जिल्हा परिषद सदस्य आणि 2004 ते 2009 या काळात अलिबाग-उरण मतदार संघाचे ते आमदार होते. रायगड जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष, प्रदेश कॉंग्रेसचे विशेष निमंत्रित सदस्य म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. आज (गुरूवार) दुपारी 2 वाजता अलिबाग तालुक्यातील सातीर्जे या मूळ गावी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details