रायगड- अलिबाग नगरपरिषदेचे सेवानिवृत्त शिपाई रंजन पाटील यांना प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहण करण्याचा मान मिळाला. पाटील नगरपरिषदेमध्ये शिपाई कामासोबतच गेल्या २५ वर्षांपासून ध्वज चढविणे आणि उतरवण्याचे काम अविरतपणे करीत होते. नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांनी ध्वजारोहणाचा बहुमान देऊन पाटील यांना सन्मानित केले.
हेही वाचा - नारायण राणेंच्या मुख्यमंत्र्यांवरील टिकेला अजित पवारांचे उत्तर, म्हणाले...