महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पनवेलमधल्या कामोठ परिसरातील इमारतीला आग; जीवितहानी नाही

कामोठे सेक्टर 21 मधल्या भूखंड क्रमांक 72 वर वरद नावाची सोसायटी आहे. याच सोसायटीतल्या चौथ्या मजल्यावर एका घरातून आगीचे लोट बाहेर येताना दिसून आले. आगीचा भडका एवढा प्रचंड होता की, आग आणि धुराने संपूर्ण चौथा मजला वेढला गेला.

raigad
आग लागल्याचे दृश्य

By

Published : Dec 24, 2019, 1:07 AM IST

रायगड- पनवेलमधल्या कामोठ परिसरातील एका सात मजली इमारतीत आग लागल्याची घटना घडली आहे. कामोठे सेक्टर 21 मधील एका इमारतीच्या चौथ्या मजल्यावर ही आग लागली आहे. अग्निशमन दलाने या आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवले आहे. सुदैवाने आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

इमारतीला आग लागल्याचे दृश्य

कामोठे सेक्टर 21 मधल्या भूखंड क्रमांक 72 वर वरद नावाची सोसायटी आहे. याच सोसायटीतल्या चौथ्या मजल्यावर एका घरातून आगीचे लोट बाहेर येताना दिसून आले. आगीचा भडका एवढा प्रचंड होता की, आग आणि धुराने संपूर्ण चौथा मजला वेढला गेला. या घटनेची माहिती मिळताच सिडकोच्या अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी काही मिनिटात घटनास्थळ गाठले. आणि आग विझवण्यासाठी आतोनात प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळविले. परिसरातील इमारतीत आग लागल्याचे दिसताच रस्त्यावर बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. दरम्यान, ही आग का लागली याचा तपास सुरू आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details