महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

तळोजा एमआयडीसीत बेकायदेशीरपणे ठेवलेल्या केमिकल कचऱ्याला आग; जीवितहानी नाही - तळोजा एमआयडीसीत आग

तळोजा एमआयडीसीत इंजिनीअरिंग, मत्स्य प्रक्रिया, खाद्य, केमिकल आदी वेगवेगळे कारखाने आहेत. या कारखान्यांमधील कचरा बेकायदेशिररित्या कासाडी नदी शेजारी टकण्यात येतो. या कारखान्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी काही महिन्यांपूर्वीच पडघे येथील स्थानिक रहिवाशांनी केली होती. पनवेल पालिकेने वेळीच लक्ष घातले असते तर आजची दुर्घटना टळली असती, अशी तक्रार नागरिक करत आहेत.

aag
तळोजा एमआयडीसीत बेकायदेशीर केमिकल साठ्याला आग

By

Published : Dec 14, 2019, 6:12 PM IST

ठाणे - तळोजा एमआयडीसीत बेकायदेशीरपणे ठेवलेल्या रसायनिक कचऱ्याला आग लागल्याची घटना घडली. पडघे गावाशेजारी असणाऱ्या कासाडी नदीजवळ मोकळ्या जागेचे हा कचरा टाकण्यात आला आहे. कचऱ्यातील रसायनांमुळेच ही आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. आग पसरण्याआधीच विझवण्यात यश आल्याने मोठा अनर्थ टळला.

हेही वाचा - कासाडी नदीचे रुप बदलणार; दंडाच्या रकमेतून केला जाणार 13 कोटींचा खर्च

तळोजा एमआयडीसीत इंजिनीअरिंग, मत्स्य प्रक्रिया, खाद्य, केमिकल आदी वेगवेगळे कारखाने आहेत. या कारखान्यांमधील कचरा बेकायदेशिररित्या कासाडी नदी शेजारी टकण्यात येतो. या कारखान्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी काही महिन्यांपूर्वीच पडघे येथील स्थानिक रहिवाशांनी केली होती. मात्र, या भंगार अड्ड्यांवर अद्याप कोणतीच कारवाई झाली नसल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. पनवेल पालिकेने वेळीच लक्ष घातले असते तर आजची दुर्घटना टळली असती, अशी तक्रार नागरिक करत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details