रायगड -अटक टाळण्यासाठी आणि अटकपूर्व जामीन रद्द न करण्यासाठी मागितलेल्या 40 हजार लाचे मागितल्याप्रकरणी एक महिला पोलीस कर्मचारी चतुर्भुज झाली आहे. रेखा मोहिते साळुंखे असे या महिला पोलीस कर्मचारीचे आहे. नेरळ पोलीस ठाण्यात ती पोलीस नाईक पदावर कार्यरत होती. ठाणे लाचलुचपत विभागाने ही कारवाई केली आहे.
नेरळ पोलीस ठाण्यात तक्रारदाराच्या नातेवाईकाविरोधात आहे गुन्हा दाखल
नेरळ पोलीस ठाण्यात तक्रारदार यांच्या आई, मावशी आणि भाऊ यांच्याविरोधात सुनेचा छळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या गुन्ह्याचा तपास हा नेरळ पोलीस ठाण्याच्या पोलीस नाईक रेखा मोहिते साळुंखे यांच्याकडे होता. नेरळ पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात आई आणि मावशी यांनी घेतलेला अटकपूर्व जमीन रद्द करू नये आणि अटक करू नये यासाठी तक्रारदार यांनी पोलीस नाईक यांना सांगितले होते.
40 हजारांची मागितली लाच
अटकपूर्व जामीन रद्द होऊ नये व अटक टाळण्यासाठी पोलीस नाईक रेखा मोहिते हिने तक्रारदार यांच्याकडे 40 हजारांची लाच मागितली. यामध्ये पोलीस उपनिरीक्षक अविनाश पाटील यांना 25 हजार तर स्वतःला 15 हजारांची लाचेची मागणी फोनद्वारे केली होती. त्यानंतर तक्रारदार यांनी ठाणे लाचलुचपत विभागाकडे तक्रार दाखल केली. तक्रारदार आणि आरोपी यांच्यात झालेली संभाषण रेकॉर्डवरून आरोपी रेखा मोहिते साळुंखे याना ठाणे लाचलुचपत विभागाने अटक केली आहे. यांनी केली कारवाईठाणे लाचलुचपत पोलीस उप अधीक्षक कुलकर्णी, पोलीस निरीक्षक सुरेश चोपडे, पोह विचारे, सोडकर, पोना गणपते, पोशी राजपूत यांनी कारवाई केली.