महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

रायगड सामान्य रुग्णालयातील नेत्रकक्ष विभाग बंद, रुग्णांना करावी लागतेय मुंबईवारी - रायगड सामान्य रुग्णालयातील नेत्रकक्ष विभाग बंद

जिल्हा सामान्य रुग्णालयात डोळ्याच्या आजारावर उपचार करण्यासाठी नेत्रकक्ष विभागाची इमारत बांधण्यात आलेली आहे. संबंधित इमारतीची दुरवस्था झाली आहे. पावसाळ्यात शस्त्रक्रिया कक्षात पाणी पडण्यास सुरुवात झाली. त्यामुळे शस्त्रक्रिया कक्ष बंद करण्यात आले आहे. रुग्ण कक्षातही भींतीमधून आणि स्लॅबमधून पाणी पडत होते. त्यामुळे नेत्रकक्ष विभाग जून महिन्यापासून बंद ठेवण्यात आलेला आहे.

रायगड सामान्य रुग्णालयातील नेत्रकक्ष विभाग बंद

By

Published : Nov 14, 2019, 9:36 PM IST

रायगड - डॉक्टरांची, रक्ताची कमतरता, इमारतीची दुरवस्था अशा समस्यांनी जिल्हा सामान्य रुग्णालय ग्रासले आहे. त्यातच गेल्या ५ महिन्यांपासून नेत्रकक्ष विभाग अंतर्गत दुरुस्ती कामामुळे बंद आहे. त्यामुळे रुग्णावर डोळ्यावरील शस्त्रक्रिया आणि उपचार बंद झाले आहेत. त्यामुळे डोळ्याच्या शस्त्रक्रियेसाठी रुग्णांना मुंबईमधील जे. जे. रुग्णालयात पाठविण्याची वेळ रुग्णालय प्रशासनावर आलेली आहे.

रायगड सामान्य रुग्णालयातील नेत्रकक्ष विभाग बंद

जिल्हा सामान्य रुग्णालयात डोळ्याच्या आजारावर उपचार करण्यासाठी नेत्रकक्ष विभागाची इमारत बांधण्यात आलेली आहे. संबंधित इमारतीची दुरवस्था झाली आहे. पावसाळ्यात शस्त्रक्रिया कक्षात पाणी पडण्यास सुरुवात झाली. त्यामुळे शस्त्रक्रिया कक्ष बंद करण्यात आले आहे. रुग्ण कक्षातही भींतीमधून आणि स्लॅबमधून पाणी पडत होते. त्यामुळे नेत्रकक्ष विभाग जून महिन्यापासून बंद ठेवण्यात आलेला आहे.

इमारतीच्या दुरवस्थेमुळे तसेच शस्त्रक्रिया आणि रुग्ण कक्षात पावसाचे पाणी पडत असल्याने शस्त्रक्रिया कक्ष पूर्णतः बंद ठेवण्यात आले आहे. नेत्रकक्ष विभागाच्या दुरवस्थेबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाला कळविण्यात आले असून इमारतीच्या दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे नेत्रकक्ष विभागात डोळ्याच्या उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना नेत्रकक्ष विभाग बंद असल्याने गैरसोय होत आहे.

जिल्हा सामान्य रुग्णालयात डोळ्याच्या उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना शस्त्रक्रिया करण्यासाठी आता मुंबईत जेजे रुग्णालयात पाठविण्यात येत आहेत. यासाठी एसटी महामंडळ विभागाशी संपर्क करून एसटी बसमधून रुग्णांना शस्त्रक्रिया करण्यासाठी नेले जात आहे. लवकरच नेत्रकक्ष विभागाचे काम पूर्ण होईल, असे जिल्हा प्लॅनिंग अधिकारी डॉ. रामदेव वर्मा यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details