रायगड - शिवसेना उमेदवार अनंत गीते यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने आचारसंहिता भंगाची तक्रार निवडणूक आयोगाकडे केली आहे. तरीदेखील त्यांच्यावर कुठलीच कारवाई करण्यात आली नाही, अशी खंत राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलीक यांनी व्यक्त केली. त्यामुळे आता केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
निवडणूक आयोगाकडे तक्रार करुनही अनंत गीतेंवर कारवाई नाही, राष्ट्रवादी उचलणार 'हे' पाऊल
अनंत गीते यांच्या प्रचारसभांमधून सिंहावलोकन नावाची पुस्तिका वाटप करण्यात येत आहे. पण या पुस्तिकेवर प्रकाशकाचे नाव नाही. कुठे छापण्यात आली याचा उल्लेख नाही. किती प्रती छापल्या याचा आकडा नाही.
अनंत गीते यांच्या प्रचारसभांमधून सिंहावलोकन नावाची पुस्तिका वाटप करण्यात येत आहे. पण या पुस्तिकेवर प्रकाशकाचे नाव नाही. कुठे छापण्यात आली याचा उल्लेख नाही. किती प्रती छापल्या याचा आकडा नाही. हा आचारसंहितेचा भंग असून निवडणूक आयोगाने यावर कारवाई करावी, अशी मागणी आघाडीचे उमेदवार सुनिल तटकरे यांनी आपल्या वकिलामार्फत केली होती.
जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, अलिबाग यांना तक्रारीबाबत कार्यवाही करून कार्य अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते. पण, अद्याप यावर कुठलीच कारवाई झाली नाही. त्यामुळे आता ही तक्रार केंद्रीय निवडणूक आयोगाकडे करण्याचे राष्ट्रवादीने ठरवले आहे.