महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

वृत्तपत्राच्या रद्दीपासून गौरी-गणपतीच्या सुबक मूर्ती; आलिबागच्या शिक्षकाचा पर्यावरणपूरक उपक्रम - वृत्तपत्रापासून गणेश मूर्ती

पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याबाबत शासनाकडून नेहमी सांगितले जाते. ही बाब लक्षात घेऊन थळे यांनी पर्यावरणपूरक अशी कागदापासून पहिली गणपतीची मूर्ती तयार केली. मात्र, तिला शाडू आणि प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीसारखा रेखीवपणा येत नव्हता. त्यामुळे थळे यांनी साच्यातील गणेश मूर्ती काढण्याचे ठरवले.

वृत्तपत्राचा वापर करून बनवल्या गणपती आणि गौरीच्या सुबक मूर्ती..!

By

Published : Aug 25, 2019, 9:50 PM IST

रायगड -गणेशोत्सव तोंडावर आला आहे. त्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी अनेकांकडून पुढाकार घेतला जात आहे. त्याचप्रमाणे आलिबाग तालुक्यातील सागाव येथील शिक्षक संतोष थळे यांनीही वृत्तपत्राच्या रद्दीपासून गौरी गणेशाच्या सूबक मूर्ती तयार केल्या आहेत.

वृत्तपत्राच्या रद्दीचा वापर करून बनवल्या गौरी-गणपतीच्या सुबक मूर्ती!
संतोष थळे वृत्तपत्राचा वापर करून गणपती आणि गौरीच्या सुबक मूर्ती तयार करतात. कागदापासून बनवलेल्या गणपतीच्या मूर्ती या पर्यावरणपूरक आहेत, असे थळे यांनी सांगितले.
संतोष थळे हे रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षक आहेत. त्यांना टाकाऊ वस्तूपासून कलाकृती तयार करण्याचा छंद आहे. कलेच्या याचं छंदातून त्यांना वृत्तपत्रापासून गणेश मूर्ती तयार करण्याची संकल्पना आली. पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याबाबत शासनाकडून नेहमी सांगितले जाते. ही बाब लक्षात घेऊन थळे यांनी पर्यावरणपूरक अशी कागदापासून पहिली गणपतीची मूर्ती तयार केली. मात्र, तिला शाडू आणि प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीसारखा रेखीवपणा येत नव्हता. त्यामुळे थळे यांनी साच्यातील गणेश मूर्ती काढण्याचे ठरवले.
शाडू किंवा प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती साच्यात तयार केल्यानंतर सुकण्यासाठी वेळ लागतो. पेपरची साच्यातील मूर्ती ही एक ते दीड तासात सुकते. साच्यातून काढलेल्या मूर्तीला रंगरंगोटी केल्यानंतर गणेश मूर्ती आकर्षक दिसतात. वृत्तपत्रापासून तयार केलेली मूर्ती आकर्षक आणि वजनाला हलकी आहे. तसेच या मूर्ती विसर्जन करण्यास कमी पाणी लागते. कागदाचे विघटनही लवकर होत असल्याने पर्यावरणाला कोणतीही हानी पोहचत नाही. वृतपत्रापासून बनवलेल्या मूर्ती चल चित्रासाठीही उपयुक्त असल्याचे थळे यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details