महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नेमबाजीच्या सरावाला आलेल्या पोलिसाच्या कारची दुचाकीस्वारास धडक - Police hit two wheeler driver

अपघातानंतर एका पोलिस कर्मचाऱ्याला पकडण्यात ग्रामस्थांना यश आले. त्याला अलिबाग पोलीस ठाण्यात नेण्यात आले. यानंतर पोलीस फायरिंगच्या सरावासाठी येतात की मौज मजा करण्यासाठी, असा प्रश्न स्थानिकांकडून उपस्थित केला जात आहे.

police

By

Published : Feb 23, 2019, 12:44 PM IST

रायगड - अलिबाग तालुक्यातील परहूर येथे पोलिसांचे नेमबाजी प्रशिक्षण सुरू आहे. येथे प्रशिक्षणासाठी कारने आलेला एक पोलीस कर्मचाऱ्याने दारूच्या नशेत तरुणीच्या दुचाकीला धडक दिली. यानंतर संबंधीत पोलीस कर्मचारी तेथून पसार झाला. ही घटना शक्रवारी रात्रीच्या सुमारास घडली.

अपघातानंतर एका पोलिस कर्मचाऱ्याला पकडण्यात ग्रामस्थांना यश आले. त्याला अलिबाग पोलीस ठाण्यात नेण्यात आले. यानंतर पोलीस फायरिंगच्या सरावासाठी येतात की मौजमजा करण्यासाठी, असा प्रश्न स्थानिकांकडून उपस्थित केला जात आहे.

अलिबाग तालुक्यातील कुरूळ गावाच्या हद्दीत २२ फेब्रुवारी रोजी एका कारने गावातील तरुणीच्या दुचाकीला धडक दिली. यामध्ये कोणास दुखापत झाली नाही. मात्र, गाडीचे नुकसान झाले. दुचाकीस धडक दिल्यानंतर कार चालक न थांबता पळून गेला. त्यानंतर ग्रामस्थानी कारचा पाठलाग केला असता ती कार शहराला लागून असलेल्या एचपीच्या पेट्रोल पंपावर थांबलेली दिसली. त्यातील एकाला पकडल्यानंतर कारमधील इतर बसलेले कार घेऊन पसार झाले.

कुरुळ ग्रामस्थानी पकडलेल्या व्यक्तीला अलिबाग पोलीस ठाण्यात नेले. तेव्हा पोलिसांनी चौकशी केली असता कारमध्ये असलेले व्यक्ती नवी मुंबई येथील पोलीस कर्मचारी असल्याचे समोर आले. पकडलेल्या व्यक्तीचे नाव सोपान आव्हाड असून त्याची नियुक्ती खारघर पोलीस ठाण्यात असल्याचे कळले.

नवी मुंबई येथील पोलीस दलाचे पोलीस फायरिंग प्रशिक्षण सरावासाठी अलिबाग येथील परहूर पाडा येथे आले आहेत. त्यापैकी काही जण नागाव येथे समुद्रावर मौज मजा करण्यासाठी आले होते. त्यावेळी या पोलिसांनी दरू पिली होती. दारूच्या नशेतच हे सरावाला आलेले पोलीस नागाव येथून आपली कार चालवत अलिबागकडे येत असताना दुचाकीला धडक दिली. या प्रकरणात दोन्ही बाजूने तडजोड झाली असून प्रकरण मिटविण्यात आलेले आहे. मात्र फायरींग प्रशिक्षणाच्या सरावासाठी आलेले पोलीस दारू पिऊन धिंगाणा घालण्यासाठी येतात की सरावासाठी हा प्रश्न उपस्थित होत आहे. तसेच पोलीस म्हणून कार्यरत असताना स्वतः नियम न पाळता नियम मोडत असल्याने जनतेच्या सुरक्षेची काळजी हे पोलीस कशी करणार याबाबतही लक्ष वेधले जात आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details