महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जून संपत आला तरी पाऊस नाही; भात पिके जगवायची कशी? शेतकऱ्यांना पडला प्रश्न - विहिर

सध्या या रोपांना शेतकरी आपल्या शेतातील बोअर, विहिर आणि तलावातून पाणी देत आहेत. मात्र, आता या जलस्त्रोतांनीही तळ गाठला आहे. त्यामुळे शेतकरी चिंतातूर आहे.

जून संपत आला तरी पाऊस नाही; भात पिके जगवायची कशी? शेतकऱ्यांना पडला प्रश्न

By

Published : Jun 26, 2019, 6:12 PM IST

रायगड- जून महिना संपत आला तरी रायगडमध्ये पावसाने हजेरी लावली नाही. तर शेतकऱ्यांनी मे महिन्यात शेतीची मशागत करून भाताच्या रोपांची पेरणी केली. आता रोपे बहरण्यास सुरुवात झाली आहे. अशातच पावसाने दडी मारल्यामुळे तसेच कडक उन्हामुळे रोपे जगवायची कसे? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.

जून संपत आला तरी पाऊस नाही; भात पिके जगवायची कशी? शेतकऱ्यांना पडला प्रश्न

सध्या या रोपांना शेतकरी आपल्या शेतातील बोअर, विहीर आणि तलावातून पाणी देत आहेत. मात्र, आता या जलस्त्रोतांनीही तळ गाठला आहे. त्यामुळे शेतकरी चिंतातूर आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details