महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मतदानाचा हक्क बजावून राष्ट्रीय सणात भाग घ्यावा - निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. सूर्यवंशी - डॉ. विजय सुर्यवंशी

रायगडमधील मतदारांनी २३ एप्रिलला मतदानाचा हक्क बजावून राष्ट्रीय सणात भाग घ्यावा, असे आवाहन जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी केले आहे.

मतदानाचा हक्क बजावून राष्ट्रीय सणात भाग घ्यावा - निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. सूर्यवंशी

By

Published : Apr 21, 2019, 9:33 PM IST

रायगड- रायगड लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी तिसऱ्या टप्प्यात २३ एप्रिलला मतदान होत आहे. रायगडमधील मतदारांनी २३ एप्रिलला मतदानाचा हक्क बजावून राष्ट्रीय सणात भाग घ्यावा, असे आवाहन जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी केले आहे.

लोकसभा मतदान करण्यासाठी दर ५ वर्षांनी संधी मिळते. त्यामुळे या राष्ट्रीय सणांमध्ये सर्व मतदारांनी भाग घेणे महत्त्वाचे आहे. रायगड जिल्ह्याचा इतिहास हा गौरवशाली आहे. आपल्या सर्वांची ओळख सुजाण नागरिक म्हणून आहे. ही ओळख सिद्ध करण्याची नामी संधी २३ एप्रिलला आहे. त्यामुळे जागृत सुजाण नागरिकांनी आपला मतदानाचा हक्क बजावून या राष्ट्रीय महोत्सवात सामील व्हावे, असे आवाहन डॉ. विजय सुर्यवंशी यांनी केले आहे.

मतदानाचा हक्क बजावून राष्ट्रीय सणात भाग घ्यावा - निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. सूर्यवंशी

मतदान ओळखपत्र नसले तरी विविध ११ प्रकारचे कागदपत्रे पुरावा म्हणून ग्राह्य धरली जातील. मतदान केंद्रात मोबाईलचा वापर करू नये. तसेच अधिक माहितीसाठी १९५० या हेल्पलाईनवर संपर्क करू शकता, असे सुर्यवंशी यांनी म्हटले आहे. २३ एप्रिलला सकाळी ७ ते सायंकाळी ६ पर्यंत मतदानाची वेळ आहे. मतदारांनी राष्ट्रीय कर्तव्य समजून आपले अमूल्य मत द्यावे, असेही सुर्यवंशी यांनी यावेळी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details