रायगड - येथील श्रीवर्धन समुद्र किनारी महाकाय डॉल्फिन मासा मृत अवस्थेत आढळला आहे. डॉल्फिन जातीतील हा महाकाय मासा साधारण 20 ते 25 फूट लांब होता. या माशाला पाहण्यासाठी श्रीवर्धनकरांनी मोठी गर्दी केली होती. या माशाला समुद्र किनारी पुरण्यात आले.
श्रीवर्धन समुद्रात डॉल्फिन जातीचे मासे मोठ्या प्रमाणात विहार करीत असतात. त्याचबरोबर श्रीवर्धन समुद्रातून मोठे जहाज व बार्ज यांची वाहतूक दिघी बंदराकडे होत असते. बार्ज व मोठी जहाज यांना धडक लागून समुद्री जिवांना नेहमीच आघात होत असतो. त्याप्रमाणेच एक महाकाय डॉल्फिन मासा बार्ज वा एखाद्या जहाजाची धडक बसल्याने मृत झाला असावा असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.